92781
गांगेश्वर नवरात्रोत्सव
अध्यक्षपदी तळेकर
तळेरे : येथील श्री गांगेश्वर-खर्जादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुयोग तळेकर यांची निवड करण्यात आली. माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्षपदी चिन्मय तळेकर, सहखजिनदार नीलेश सोरप व विश्वनाथ पेडणेकर यांची निवड करण्यात आली. खजिनदार सदानंद तळेकर व उमेश कदम यांची फेरनिवड झाली. कार्यकारिणी सभासद व सल्लागार यांची नावे कायम ठेवण्यात आली. श्री गांगेश्वर मंदिर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. या बैठकीस सरपंच हनुमंत तळेकर, अनिल मेस्त्री, धनंजय खटावकर, विनोद धुरे, प्रमोद खटावकर, संदीप घाडी आदी उपस्थित होते.