कोकण

कुडाळमध्ये हिंदी दिन उत्साहात

CD

92786

कुडाळमध्ये हिंदी दिन उत्साहात
कुडाळ ः क.म.शि.प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा कुडाळ येथे हिंदी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत कबीर, संत तुलसीदास, संत रहीम यांचे दोहे सादर केले. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्रेमचंद, हरिवंशराय बच्चन, सूरदास निराला यांची माहिती सांगितली. हिंदी भाषेचा गौरव करणारे एक नृत्य देखील विद्यार्थिनींनी सादर केले. या कार्यक्रमास हिंदी भाषा दिनाला साजेशी आकर्षक सजावट करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कठपुतलींचा खेळ मुख्य आकर्षण ठरला. या खेळामधून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका मुमताज शेख उपस्थित होत्या. सातवीचा विद्यार्थी विहान खानोलकर याने सूत्रसंचलन केले. रियाज शेख, वैशाली शेट्टी, नेहा कुडाळकर, सूरज गोसावी, कविता साबलपरा, मधुरा रेमुळकर आदी उपस्थित होते.
...................
92787

सुकळवाड येथे ‘पंचायत राज’ अभियान
मालवण : सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तहसीलदार वर्षा झालटे यांनीही या ठिकाणी भेट दिली. या ग्रामसभेला सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल वाळके, जान्हवी पालकर, वृषाली गरुड, जानकी पावसकर, प्रमिला पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी, पंचायत समिती प्रशिक्षक अधिकारी भीमसेन पळसंबकर, मंडळ अधिकारी स्वप्नील जंगले, तलाठी रेश्मा पाताडे, माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांच्यासह सुमारे १६० ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: 'वीरशैव अन्‌ लिंगायत एकच; नवीन धर्माला नाही पाठिंबा'; हुबळीतील संमेलनात चार जगद्‌गुरू..

Suji Chila Vs Besan Chilla Vs Wheat Roti: रवा चिला, बेसण चिला कि चपाती? वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?

Air Pollution: वायू प्रदूषणाच्या संकटावर मात! पनवेल पालिकेची १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा

U19 IND vs U19 AUS: भारताने फक्त ३१ ओव्हरमध्ये पार केलं ऑस्ट्रेलियाचं मोठं लक्ष्य; पहिल्या वनडेत दणदणीत विजय

PM Modi: आधी व्यापाऱ्यांच्या वेदनेचा संघर्ष सांगितला; नंतर नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाला कोणता नवा मंत्र दिला?

SCROLL FOR NEXT