कोकण

परुळेकर कनिष्ट महाविद्यालयाचे यश

CD

92780

परुळेकर कनिष्ट महाविद्यालयाचे यश
मालवण : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा प्रकारात स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ काळसे संघाला नमवून विजयी झाला. हा संघ जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर १९ वर्षांखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला. मुलांच्या संघात राज लाड, आर्यन सुर्वे, शुभम लुडबे, मयुर बागवे, सार्थक आचरेकर, आयुष म्हापणकर, निशांत शिरोडकर, रोहन कांदळगावकर, तानाजी मानवर, सूरज आळवे यांचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
----------
92779

मेढा पीर उत्सवास वैभव नाईकांची भेट
मालवण : शहरातील मेढा येथील पीर दर्गा येथे उरुस उत्सवानिमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उरुस उत्सवाच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सादिक मुजावर व फारुक मुकादम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, नरेश हुले, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर, चिंतामणी मयेकर, नदीम मुजावर, आसिफ मुजावर, आझिम मुजावर, मोहसीन मुजावर, सिराज मुजावर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, बाबा मुकादम, उमेश चव्हाण, अक्षय भोसले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: 'वीरशैव अन्‌ लिंगायत एकच; नवीन धर्माला नाही पाठिंबा'; हुबळीतील संमेलनात चार जगद्‌गुरू..

Suji Chila Vs Besan Chilla Vs Wheat Roti: रवा चिला, बेसण चिला कि चपाती? वजन कमी करण्यासाठी काय फायदेशीर?

Air Pollution: वायू प्रदूषणाच्या संकटावर मात! पनवेल पालिकेची १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा

U19 IND vs U19 AUS: भारताने फक्त ३१ ओव्हरमध्ये पार केलं ऑस्ट्रेलियाचं मोठं लक्ष्य; पहिल्या वनडेत दणदणीत विजय

PM Modi: आधी व्यापाऱ्यांच्या वेदनेचा संघर्ष सांगितला; नंतर नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाला कोणता नवा मंत्र दिला?

SCROLL FOR NEXT