कोकण

वंचित आघाडीतर्फे खेडमध्ये घंटानाद आंदोलन

CD

वंचिततर्फे खेडमध्ये घंटानाद आंदोलन
ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष ; कोंडीवलीतील भूखंडाची मोजणी करा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २० : सरकारी जमीन वाचवा, अतिक्रमण रोखा, अशा घोषणा देत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खेड पंचायत समिती कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. कोंडीवलीत होणाऱ्या शासकीय भूखंडाची मोजणी वारंवार मागणी करूनही होत नसल्याने हा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. शासकीय भूखंडाची तातडीने मोजणी करून अतिक्रमण हटवा आणि कोकण रेल्वेप्रकल्पात घरे गेलेल्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांनी सरकारवर उदासीनतेचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करून जनतेला न्याय नाकारल्याचा आरोप केला. कोंडिवली गावातील शासकीय जमिनीवर बेकायदा अतिक्रमण करण्यात आले असून, याबाबतची तक्रार करूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने खेड पंचायत समितीसमोर घंटानाद आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. या वेळी त्यांनी कळंबणी गावातील ग्रामसेवकाविरोधात घरकुल प्रकरणात झालेल्या तक्रारीबाबत देखील कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली. आंदोलनात गावातील अनेक नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी आंदोलकांची भेट घेतली. मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयांमध्ये या प्रकरणी पंचायत समितीमार्फत केलेला पत्रव्यवहार तपासून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
----
कोट
ग्रामस्थांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत आहे. शासनाने तातडीने मोजणी करून अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
- गिरीश गमरे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘बळकट लोकशाही हाच अंतर्गत सुरक्षेचा पाया’; सदानंद दाते

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

Thane News: ठाण्याच्या नो एंट्रीमुळे पनवेल कोंडीत! १८ तासांच्या बंदीने घुसमट, वाहतूकदारांना फटका

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

SCROLL FOR NEXT