rat२०p१३.jpg-
२५N९२८१८
रत्नागिरी ः राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम तर मुंबई संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
---
क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीचे खेळाडू चमकले
महाराष्ट्र विजयी तर मुंबई उपविजयी; आदित्य पवार सर्वोत्कृष्ट फलंदाज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तरप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने ७वी १७ वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा (उत्तरप्रदेश) येथे झाली. त्यात महाराष्ट्र संघाने विजय मिळवला. या संघात रत्नागिरीतील गौरीज माळी (रत्नागिरी), आयुष खरात (रत्नागिरी, खेड) या खेळाडूंचा सहभाग होता.
राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघामध्ये रत्नागिरीतील आदित्य पवार (दापोली), सुबोध मायनाक (खेड), सिद्धेश गोलांबडे (दापोली) या खेळाडूंचा सहभाग होता. मुंबई संघाकडून खेळणारा दापोलीतील आदित्य पवार याला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून चषक देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई संघाने यश प्राप्त केले. त्याबद्दल दोन्ही संघांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांचे मार्गदर्शक भारतीय तथा महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वूमन डायरेक्टर धनश्री गिरी, सिंधुदुर्ग जिल्हा सचिव कुणाल हळदणकर, विजय उंबरे, लखन देशमुख, सोमा बिराजदार यांनी मार्गदर्शन केले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुमीत अणेराव, जिल्हा सचिव सिद्धेश गुरव, रोशन किरडवकर, मुख्य प्रशिक्षक मनोज पकये, पियुष पवार, साहिल सावंत यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रथमेश डांगे, सुशांत राईन, मिलिंद माळी, रमाकांत कांबळे, सागर भारती, भावेश लोंढे, सुनील मोर्ये, गणेश खानविलकर यांनी मुलांचे, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले.