कोकण

फोटोसंक्षिप्त-रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिनी इन्सुलीत शालेय साहित्य वाटप

CD

९२८२३
रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिनी
इन्सुलीत शालेय साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त इन्सुली गावातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मराठा समाज अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन राऊळ यांच्या पुढाकाराने इन्सुली गावातील १० जिल्हा परिषद शाळांमधील १८० विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. ​या कार्यक्रमाचे आयोजन नितीन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी सुहास ठाकूर, गौरेश हळदणकर, रामचंद्र पालव, तंटामुक्ती अध्यक्ष वृषाल पोपकर, गजेंद्र कोठावळे, आपा सावंत, अनिकेत मांजरेकर आणि सौरभ कोठावळे उपस्थित होते. या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व शिक्षकवर्ग तसेच स्थानिक मान्यवर यांनीही सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ​यावेळी नितीन राऊळ यांनी, समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण विकासासाठी हातभार लावणे गरजेचे आहे, असे सांगितले. मुलांचे भवितव्य घडविणे हीच खरी सेवा आहे, असे सांगितले. शैक्षणिक साहित्याच्या वाटपामुळे मुलांना शिक्षणात अधिक रुची निर्माण होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

९२८२४

आरोग्य शिबिराला
शिरगावात प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टेलीमेडिसीन सेंटरच्यावतीने शिरगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते याचा प्रारंभ झाला. यावेळी शिरगाव उपसरपंच संतोष फाटक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित ढवळे, राजेंद्र शेट्ये, मंगेश लोके, सुभाष नार्वेकर, शैलेंद्र जाधव, शिरगाव पोलिसपाटील चंद्रशेखर साटम, सदानंद चव्हाण, महेश जाधव, संतोष जंगले, शरद फाटक, प्रथमेश लाड तसेच आरोग्य तपासणीसाठी ग्रामस्थ उपस्थित होते.

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

Karad News : प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी, म्हणाले...

SCROLL FOR NEXT