कोकण

सिंधुदुर्गातील शिक्षकांचा सार्थ अभिमान

CD

92831

सिंधुदुर्गातील शिक्षकांचा सार्थ अभिमान
दीपक केसरकर ः सावंतवाडीत गुरुसेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः जिल्ह्यातील शिक्षक हे गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करतात. त्यामुळेच महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पहिल्या क्रमांकावर येतो, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. याचे खरे श्रेय शिक्षकांना आहे, असे गौरवोद्‌गार माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी काढले.
आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आदर्श शिक्षक गुरुसेवा सन्मान पुरस्कार व दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ सावंतवाडीत मोठ्या उत्साहात झाला. आमदार केसरकर यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, ॲड. नीता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नारायण ऊर्फ बबन राणे, गटशिक्षणाधिकारी संविता परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, अनारोजीन लोबो, भारती मोरे, बाबू कुडतरकर, वासुदेव होडावडेकर, अर्चित पोकळे, भरत गावडे, विकास गोवेकर, म. ल. देसाई, निखिल सावंत, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘दरवर्षी आम्ही हा सन्मान करतो. विद्यार्थी, शिक्षकांच्या कामाची नोंद कोणीतरी घ्यावी लागते, यासाठी हा उपक्रम सुरू आहे. जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान आम्ही करतो. शिक्षणमंत्री मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा इथल्या भागाला, शिक्षक, विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केला. इथल्या विद्यार्थी, शिक्षकांचा मला अभिमान वाटतो.’
जिल्हाप्रमुख परब म्हणाले, ‘केसरकर यांच्या हस्ते मिळालेला सन्मान तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाईल. राजकारणात आदराने वागणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. त्यात श्री. केसरकर एक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश फार मोठे आहे. त्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. पालकांनी मुलांच्या कलाने त्यांना भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.’’
यावेळी श्री. केसरकर यांच्या हस्ते दीपक राऊळ (तिरोडे शाळा क्र. १), अभिजित जाधव (कलंबिस्त हायस्कूल), बाबाजी भोई (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद शाळा माणगाव), राजेंद्र राठोड (भगवती देवी विद्यालय आंब्रड), रामजी पोळजी (मठ), शीला सामंत (एस. आर. पाटील हायस्कूल पाट), देविदास प्रभुगावकर (रेवतळे), राजू देसाई (भंडारी हायस्कूल मालवण), स्वाती हिंदळेकर (दाभोळे क्र. २), आफ्रीन बागी (देवगड हायस्कूल), वंदना राणे (कणकवली क्र. १), स्मिता गरगटे (एस. एस. हायस्कूल कणकवली), प्रवीण देसाई (झोळंबे), समीर परब (झोळंबे हायस्कूल), शोभा केळकर (विद्यामंदिर खांबाळे), संदेश तुळसलकर (अर्जुन रावराणे हायस्कूल वैभववाडी) यांना गुरु सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच बाबली चिले, शंकर पावसकर, संगीता सावंत, घनदा शिंदे, उन्नती कराळे, अनुराधा गावडे, सुनीता दळवी, कल्पना बोडके यांचे विशेष सन्मान करण्यात आले. सार्जंट अनंत चिंचकर व प्रशिक्षक गोपाळ गवस यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे, सूत्रसंचालन सौ. पालव यांनी केले. आभार सीमा पंडित यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

Karad News : प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी, म्हणाले...

SCROLL FOR NEXT