कोकण

घाणेखुंटच्या शाश्वत विकासावर भर देऊया

CD

- ratchl२०२.jpg-
२५N९२८४४
चिपळूण ः घाणेखुंट येथे झालेली ग्रामसभा.
---
घाणेखुंटच्या विकासावर भर देऊया
संतोष ठसाळे ः ग्रामसभेत अभियानाच्या नियोजनावर भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामस्थांनी योगदान दिले पाहिजे. जिल्ह्यात अग्रगण्य ग्रामपंचायत होण्यासाठी ग्रामस्थांच्या सहयोगातून कामे करूया तसेच घाणेखुंट गावाचा सर्वांगीण विकास करतानाच शाश्वत विकासावर भर देऊ, असे प्रतिपादन घाणेखुंटचे सरपंच संतोष (राजू) ठसाळे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या ग्रामसभेत ते बोलत होते. खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. घाणेखुंट ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना केलेल्या आवाहनानुसार, १८९ ग्रामस्थांनी अभूतपूर्व सहभाग नोंदवला. या अभियानाची माहिती देण्यासाठी खेड पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी शिगवण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, ग्राममहसूल अधिकारी दिव्या सकपाळ, ग्रामपंचायत अधिकारी सोनकुसरे, सीआरपी पालांडे, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माजी सैनिक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी ठसाळे म्हणाले, घाणेखुंट गावात नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. पर्यावरण समतोलासाठी विविध स्पर्धाही घेतल्या. वृक्षारोपण कार्यक्रमांत ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातही लोकसहभागातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी या विविध उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘बळकट लोकशाही हाच अंतर्गत सुरक्षेचा पाया’; सदानंद दाते

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

Thane News: ठाण्याच्या नो एंट्रीमुळे पनवेल कोंडीत! १८ तासांच्या बंदीने घुसमट, वाहतूकदारांना फटका

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

SCROLL FOR NEXT