कोकण

शिवप्रतिष्ठानतर्फे ''दुर्गामाता दौड''

CD

शिवप्रतिष्ठानतर्फे
‘दुर्गामाता दौड’
सावंतवाडी ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या दिवसांत शहरात दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हिंदू माता-भगिनी आणि बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी शहरात गेली १० वर्षे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे याही वर्षी घटस्थापनेच्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. उभाबाजार येथील शिवतीर्थापासन प्रत्येक दिवशी शहरातील एका देवीकडे जाऊन देव, देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळ देण्याचे मागणे मागणार आहोत, अशी माहिती शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी दिली आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत रोज सकाळी सव्वासहा वाजता या दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालवणात उद्या
रक्तदान शिबिर
मालवण : सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आणि मालवण ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने सोमवारी (ता. २२) सकाळी ९ ते १ या वेळेत पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे महिला व पुरुषांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधू रक्तमित्र तालुकाध्यक्षा शिल्पा खोत व डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे.

बर्वे ग्रंथालयाची
गुरुवारी सभा
देवगड ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.२५) दुपारी ३.३० वाजता संस्थेच्या सभागृहात ग्रंथालयाचे अध्यक्ष गुरुदेव परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेस ग्रंथालयाच्या सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालयाचे सचिव सीताराम पाटील यांनी केले आहे.

केळकर हायस्कूलमध्ये
खो-खो स्पर्धेचे आयोजन
देवगड ः तालुक्यातील वाडा येथील अ. कृ. केळकर हायस्कूलच्या मैदानावर येत्या नोव्हेंबरला तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय गटातील दहावीपर्यंत मुले व मुली अशा निमंत्रित संघांमध्ये होईल. या स्पर्धेचे नियोजन वाडा हायस्कूलची क्रीडा समिती करत असून, स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या खो-खो स्पर्धेला बहुसंख्य क्रीडाप्रेंमीनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे व स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन प्रशालेचे क्रीडा शिक्षक उत्तरेश्वर लाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

Karad News : प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी, म्हणाले...

Shirur Crime : पन्नास लाखाच्या फसवणूक प्रकरणी पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : पवईमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाने दिला जीव

SCROLL FOR NEXT