कोकण

चिपळुणात नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

CD

चिपळुणात नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी
महिलांच्या मतांची जुळवाजुळव ; मोफत देवदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः चिपळूण पालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सज्ज झालेल्या अनेक महारथींनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. महिलांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी काहींनी देवस्थान भेटीसाठी गाड्यांची व्यवस्था आतापासून केली आहे. नगराध्यक्षपद पुरुष उमेदवारासाठी जाहीर होईल, असे डोक्यात ठेवून त्याची पेरणी सुरू झाली आहे.
चिपळुणात पालिकेची आगामी निवडणूक महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची अपेक्षा असली तरी युती किंवा आघाडी होईल, याबाबत इच्छुक उमेदवार अजूनही साशंक आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आपापल्यापरीने तयारी सुरू केली आहे. गेली दोन वर्षे तर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवदर्शन महिलांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले होते. तालुक्यातील देवीदर्शनाला मोफ गाड्यांची व्यवस्था असल्याने काहींनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर करून आपल्या प्रभागातील महिलांना त्याची माहिती दिली आहे.

चौकट
युती झाल्यास बंडखोरीची चिन्हे
आगामी निवडणूक महायुती विरूद्ध आघाडी होणार की, प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार हे महत्त्वपूर्ण आहे. जर स्वबळावर निवडणूक झाली तर उमेदवारांची संख्या वाढणार आहे. जर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाली तर चुरशीची लढत चिपळूणमध्ये होणार आहे. यामध्ये उमेदवारांची संख्या कमी होऊन इच्छुकांचा हिरमोड होऊन पेरणी करणाऱ्या अपक्षांची संख्या मात्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘बळकट लोकशाही हाच अंतर्गत सुरक्षेचा पाया’; सदानंद दाते

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

Thane News: ठाण्याच्या नो एंट्रीमुळे पनवेल कोंडीत! १८ तासांच्या बंदीने घुसमट, वाहतूकदारांना फटका

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

SCROLL FOR NEXT