कोकण

जीवनात सत्व, जगण्यात ममत्व तर मानवी जीवन सुखकर

CD

जीवनात सत्व, जगण्यात ममत्व
तर मानवी जीवन सुखकर

लिमये ः कनेडी प्रशालेत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कनेडी,ता. २६ ः तरूणांनी तंबाखूसह विविध अंमली पदार्थ मुक्तीचे भान ठेवून आपले चांगले वर्तन ठेवले पाहिजे. आपल्या कुंटुंबाची, समाजाची प्रतिष्ठा राखून गैरवर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी आणि निरोगी आयुष्य जगावे, असे प्रतिपादन निवृत्त विस्तार आरोग्य अधिकारी प्रमोद लिमये यांनी येथे केले.
कनेडी येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. लिमये बोलत होते. रोटरी क्लब कणकवली यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ संदर्भात मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी यांनी प्रास्ताविक करत पाहुण्यांचे स्वागत केले. भारत हा तरुणांचा देश आहे. वय वर्ष १८ ते २५ युवा शक्ती भारतात सर्वांत जास्त आहे. कोणताही देश हा चांगल्या विचाराने बदलत असतो. पंधरा ते तीस सप्टेंबर हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आतापर्यंत मानवाने अनेक शोध लावले. मात्र, मानव समाधानी नाही, त्यामुळे नितीमूल्यांचा ऱ्हास, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहिली नाही. सर्वत्र गुन्हेगारी वृत्तीचे प्रमाण वाढले आहे. त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि व्यसनाधिनता वाढली, चांगले-वाईट यातील फरक कळत नाही. जे शाळेत शिकवले जाते ते समाजात घडत नाही, जे समाजात घडते ते शाळेत शिकवले जात नाही. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ घातक आहेत. तंबाखुत निकोटिन व विविध रासायनिक घटक असतात. निकोटिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, नपुसंकत्व व वंध्यत्व येते. तसेच कर्करोग आणि शरीराचे अनेक आजार होतात. निसर्गातील रानमेवा पाने, फुले, फळे या पासून मद्य बनवली जाते. संपूर्ण शरीरावर मद्याचा परिणाम होतो. मुत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड निकामी होतात. तसेच अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात घातक असतात. त्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो. जीवनात सत्व, वागण्यात तत्व, जगण्यात ममत्व असेल तर मानवी जीवन सुखकर होईल, असे श्री. लिमये यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे खजिनदार गुरूनाथ पावसकर आदी उपस्थित होते. प्रसाद मसुरकर यांनी सूत्रसंचालन केले. यांनी आभार प्रशांत माने मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Red Alert : राज्यातील बावीस जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Rohit Pawar : ‘’मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला...’’ ; रोहित पवारांनी साधला निशाणा!

Finance Ministry New Address: अर्थ मंत्रालयाला नवे घर मिळणार, नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडणार, 'या' भवनात नवा प्रवास सुरू करणार

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस धोक्याचे, पावसाचा जोर आणखी वाढणार; मान्सूनचा राज्यातील परतीचा प्रवास लांबला

IND vs SL Live: अभिषेक शर्माचा विक्रमांचा पाऊस! तिलक वर्मा, संजू सॅमसनची साथ; भारताच्या तगड्या धावा

SCROLL FOR NEXT