कोकण

तळवणे माऊली मंडळातर्फे आजपासून नवरात्रोत्सव

CD

तळवणे माऊली मंडळातर्फे
आजपासून नवरात्रोत्सव
आरोंदा, ता. २१ ः तळवणे येथील श्री देवी माऊली नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २२) श्री देवी माऊलीचे विधीवत पूजन व घटस्थापना करण्यात येणार आहे. या निमित्ताने रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मंगळवारी (ता. २३) रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा नाट्यप्रयोग, २४ ला सायंकाळी ६ वाजता हळदी-कुंकू कार्यक्रम, रात्री ८ वाजता श्री सातेरी भूमिका महादेव, कासारवर्णे पेडणे गोवा यांचे समई नृत्य, रात्री ९ वाजता तालुकास्तरीय फुगडी ग्रुपची जुगलबंदी, श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ, श्री गवळदेव फुगडी मंडळ बोर्डवे सुंदरवाडी यांचा कार्यक्रम, २५ ला रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ वालावल यांचा नाट्यप्रयोग, २६ ला रात्री ८ वाजता तालुकास्तरीय दांडिया नृत्य, २७ ला रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा नाट्यप्रयोग, २८ ला रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना रिया मेस्त्री (स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ, लोरे कणकवली) व साची मुळम (श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ हुर्शी, देवगड) यांच्यात रंगणार आहे. तसेच २९ ला सायंकाळी ४ वाजता गाव मर्यादित रांगोळी स्पर्धा, रात्री ८ वाजता रामकृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुल तेंडोली यांचा ‘स्वरसंध्या’ हा कार्यक्रम, ३० ला सकाळी ८ वाजता शारदोत्सव (तळवणे शाळा क्र.१), सरस्वती पूजन व सांस्कृतिक कार्यक्रम, १ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता भजने, २ ला सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, रात्री ८ वाजता वारकरी भजन, १० वाजता श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता सामुदायिक आरती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Reform : देशातील जनता 'गब्बर सिंग टॅक्स' कधीही विसरणार नाही; मल्लिकार्जून खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Viral: एआयची कमाल! महिलेने ChatGPT वापरून $150,000 ची लॉटरी जिंकली, पण कशी? जाणून घ्या...

IND vs PAK: अरे कॅच घेतला रे! संजू सॅमसनने जमिनीलगत झेलला चेंडू, पाकिस्तानी फलंदाजही झाला शॉक; पाहा Video

हुंड्यासाठी विवाहितांचा वाढतोय कौटुंबिक छळ! ‘माहेरहून पैसे आण नाहीतर मूल होऊ देणार नाही’, सासरच्यांची विवाहितेला धमकी; पैशासाठी मेव्हण्याचे तुकडे करण्याची पतीची धमकी

Nashik Accident:'वाहन पलटी हाेऊन १ ठार तर ११ गंभीर जखमी'; सप्तशृगी वणी गडावर ज्याेत नेण्यासाठी जाताना घडली घटना, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT