कोकण

चिपळूण-लोटिस्माला मिळाले केसरी, मराठाचेचे दुर्मिळ अंक

CD

rat19p21.jpg
93008
चिपळूणः केसरी, मराठाचे दुर्मिळ अंक लोटिस्माच्या संग्रहालयात दाखल झाले आहेत.
----------
लोटिस्माला मिळाले केसरी, मराठाचे दुर्मिळ अंक
वासुदेव कुलकर्णींनी दिले भेट; वाचनालयाकडून कृतज्ञता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे संग्रहालयात लोकमान्य टिळकांच्या दैनिक केसरीसह महत्त्वाचे दुर्मिळ अंक भेटस्वरूपात दाखल झाले आहेत. दैनिक केसरीचे माजी सहसंपादक वासुदेव कुलकर्णी यांनी हे अंक वाचनालयाला भेट दिले आहेत.
दैनिक केसरीचा पहिला अंक ४ जानेवारी १८८१ रोजी प्रकाशित झाला होता. विशेष म्हणजे या अंकाचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. इंग्रज सरकारला धडकी भरवणाऱ्या या दैनिक केसरीचे पुढे लोकमान्य टिळक संपादक झाले होते. मराठी नियतकालिकात महत्त्वाचा अंक म्हणजे मनोरंजन मासिकाचा दिवाळी अंक होय. महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठी परंपरा आहे. दरवर्षी दिवाळीत रसिक वाचक विविध दिवाळी अंकांच्या प्रतिक्षेत असतात. मराठी साहित्यविश्वात दिवाळी विशेषांकाची परंपरा मनोरंजन मासिकाने सुरू केली.
१९०९ मध्ये पहिला दिवाळी अंक मनोरंजनाने प्रकाशित केला होता. मनोरंजन दिवाळी अंकासह वैचारिक साहित्यात अग्रेसर असलेल्या माणूस मासिकाचा जून १९६१चा पहिला अंक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शासनाला सळो की पळो करून सोडणाऱ्या आचार्य अत्रे यांनी सुरू केलेला दैनिक मराठाचा १५ नोव्हेंबर १९५६चा पहिला अंक, समतानंद अनंत हरी गद्रे यांच्या संपादनाने प्रसिद्ध झालेला मौज मासिकाचा अंक आता वाचनालयाच्या संग्रहालयात पाहायला मिळणार आहे. या अमूल्य भेटीसाठी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरूण इंगवले यांनी वासुदेव कुलकर्णी यांना धन्यवाद दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

Upper farmer:'उपरीतील शेतकऱ्यांचा बंधाऱ्यावरुन जीवघेणा प्रवास'; कासाळ ओढ्यावर पुलाची मागणी

Kunbi Note: 'साेलापूर जिल्ह्यात कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण'; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र

Palghar Crime: 'बोईसर तारापूर खून प्रकरणातील दोघे आरोपींना अटक'; पोलिसांनी आरोपींना राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातमधून घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Update : गुरुकुलामध्ये ऐतिहासिक सामूहिक महालय श्राद्ध सोहळा पार पडला

SCROLL FOR NEXT