कोकण

साळिस्तेत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

CD

साळिस्तेत धार्मिक,
सांस्कृतिक कार्यक्रम
तळेरे ः साळिस्ते गुरववाडी येथील नवतरुण मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. २२) सोमवारी सकाळी ढोल वाद्यांच्या गजरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, त्यानंतर ३ ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी ८ वाजता हरिपाठ, ९ वाजता आरती, तीर्थप्रसाद, रात्री ९.३० वाजता ढोल वादन, १०.३० वाजता वाजता गरबा व दांडिया, १ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता सत्यनारायण महापूजा, होमहवन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, ३ ते ५ पर्यंत हळदीकुंकू, रात्री १० वाजता स्थानिक भजने, ३ ला मूर्ती विसर्जन मिरवणूक होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
..................
‘आधार’ योजनेबाबत
विद्यार्थ्यांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. यासाठी विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पद्धतीने २९ सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाची आहे.
.......................
‘स्वयंम’ योजनेसाठी
ऑनलाईन अर्ज भरा!
सिंधुदुर्गनगरी ः इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. या योजनेसाठी विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्याक्रमध्ये (बिगर व्यावसायिक अभ्यसक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने २९ सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाचे आहे.
.......................
शासकीय वसतिगृहात
मोफत प्रवेशाची संधी
सिंधुदुर्गनगरी ः शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी २९ सप्टेंबर मुदतवाढ दिल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी दिली. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, बांधकरवाडी कणकवली येथे सुरू झाले आहे. बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमध्ये शिक्षण घेणाऱ्या (बिगर व्यावसायिक अभ्यासक्र वगळून) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज संकेतस्थळावर जाऊन भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे जमा करावयाची आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उदयसिंह गायकवाड, यांनी केले आहे.
.......................
सावंतवाडीत शनिवारी
ज्येष्ठांसाठी ‘वॉकेथॉन’
सावंतवाडी ः स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी या संस्थेच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्थेमार्फत वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शनिवारी (ता. २७) सकाळी ६ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी येथे होणार आहे. स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. गट क्र १ (६० वर्षांवरील)-संपूर्ण मोती तलावाला चालत दोन फेर्‍या. गट क्र. २ (७० वर्षांवरील)-मोती तलावाला चालत १ फेरी. गट क्र. ३ (८० वर्षेवरील)-मोती तलावाच्या अर्ध्या भागाला १ फेरी. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी, वसंत प्लाझा, गांधी चौक सावंतवाडी येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत करावयाची आहे. वयाचा पुरावा सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडीचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: अरे कॅच घेतला रे! संजू सॅमसनने जमिनीलगत झेलला चेंडू, पाकिस्तानी फलंदाजही झाला शॉक; पाहा Video

हुंड्यासाठी विवाहितांचा वाढतोय कौटुंबिक छळ! ‘माहेरहून पैसे आण नाहीतर मूल होऊ देणार नाही’, सासरच्यांची विवाहितेला धमकी; पैशासाठी मेव्हण्याचे तुकडे करण्याची पतीची धमकी

Nashik Accident:'वाहन पलटी हाेऊन १ ठार तर ११ गंभीर जखमी'; सप्तशृगी वणी गडावर ज्याेत नेण्यासाठी जाताना घडली घटना, नेमकं काय घडलं..

Teacher Transfer Emotional : मॅडम, तुम्ही जाऊ नका! विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा; बीबीदारफळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेसाठी चिमुकले भावूक

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT