दापोली लीग क्रिकेट स्पर्धेवर
संतोष एजन्सीचे वर्चस्व
दापोली ः दापोली मान्सून चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेत संतोष एजन्सी संघाने विजेतेपद पटकावले, तर सनी कोंड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिसरा क्रमांक राज फायटर, तर चौथा जिबर फायबर संघाला मिळाला. दापोली रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका व राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा साधना बोत्रे आणि राहुल राठोड यांच्या हस्ते झाले. यामध्ये १० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा सामनावीर म्हणून अमय पालकर (संतोष एजन्सी) याची निवड करण्यात आली. तर सर्वोत्तम फलंदाज समीर सावंत (राज फायटर), सर्वोत्तम गोलंदाज व मालिकावीर किशोर गुंदेकर (संतोष एजन्सी), तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून अविनाश तांबे (राज फायटर) यांचा गौरव करण्यात आला.
92998
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत
जरियान आराईला सुवर्णपदक
दापोली : नॅशनल हायस्कूल येथील जरियान फारूक आराई याने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत जरियानने स्नॅच प्रकारात ५० किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात ६० किलो असे एकूण ११० किलो वजन उचलून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक अशफाक खान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, संस्थेचे सचिव इकबाल परकार आणि मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी अभिनंदन केले.
जे. डी. पराडकर यांच्या पुस्तकाला
कोमसापचा पुरस्कार जाहीर
संगमेश्वर ः कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२३-२४ चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाले असून, त्यामध्ये लोवले संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या ‘अक्षरयात्रा’ या लेखसंग्रहाला द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अक्षरयात्रा हे पराडकर लिखित सहावे पुस्तक आहे. कोकणातील व्यक्तिमत्त्व, चालिरिती, परंपरा, पर्यावरण, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर लेखन करणाऱ्या संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अक्षरयात्रा या पुस्तकात पराडकर यांनी कोरोना काळात सलग १०० दिवस लिहिलेल्या १०० ललित लेखांपैकी ६४ लेखांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.