93043
भरड दत्त मंदिरात रंगली काव्य मैफल
मालवण, ता. २२ : श्री शिवाजी वाचन मंदिरतर्फे अभियान आम्ही मालवणी व दत्तमंदिर भरड मालवण यांच्या सहयोगाने कोकणातील मान्यवर कवींची काव्य मैफिल नुकतीच झाली. श्री दत्त मंदिर भरड येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर श्री शिवाजी वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कवी रुजारिओ पिंटो, प्रा. एल. बी. पाटील, कॉम्रेड गोपाळ शेळके, मच्छिंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते. कवी जनार्दन संताने यांनी ईशस्तवन केले. प्रा. एल. बी. पाटील यांनी कोमसाप रायगडच्या वतीने डॉ. दिघे व पिंटो यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर रुजारिओ पिंटो, प्रा. एल. बी. पाटील, मच्छिंद्र म्हात्रे, कॉम्रेड ॲड. गोपाळ शेळके, लवेंद्र मोकल, रामचंद्र म्हात्रे, अजय शिवकर, रमण पंडित, जनार्दन संताने, गजानन म्हात्रे, नरेश पाटील व गोपीनाथ ठाकूर यांनी काव्य सादरीकरण केले. तुळशीदास पाटील यांनी ढोलकीची साथ दिली. ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, चारुशीला देऊलकर, स्मिता बर्डे, वासुदेव काजरेकर, रत्नाकर कोळंबकर, श्रीधर काळे, कमल बांदकर, निशा बिडये, ग्रंथपाल मानसी दुधवडकर, साक्षी सावंत उपस्थित होते. डॉ. दिघे यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा केळकर यांनी आभार मानले.
------------
93042
चिवला किनारी स्वच्छता मोहीम
मालवण, ता. २२ : केंद्राच्या गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात सध्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा होत आहे. यंदाच्या ‘स्वच्छोत्सव’ या घोषवाक्याला अनुसरून येथील पालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज येथील चिवला बीचवर विशेष स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबविली. मालवण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये पालिकेचे अधिकारी, सफाई कर्मचारी, तसेच एनसीसीचे विद्यार्थी, मत्स्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या सर्वांच्या सक्रिय योगदानाने हा उपक्रम पार पडला. या मोहिमेचा मुख्य उद्देश सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवणे हा होता. चिवला बीचसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाची स्वच्छता करून सहभागींनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.