93044
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी
प्लास्टिकचा वापर टाळावा
जिल्हाधिकारी ः आचरा-देवबाग किनारी स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स यांसारखा न विघटनारा कचरा पर्यावरणाचा समतोल बिघडवतो. पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक वापर शून्यावर आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत आचरा ते देवबाग समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः मोहिमेत सहभागी होऊन किनाऱ्यावर विखुरलेल्या प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स व इतर कचरा गोळा केला. त्या म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या माध्यमातून वाढणारा प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. प्रशासनाच्या स्तरावर उपाययोजना होत असल्या तरी ‘प्लास्टिकमुक्त किनारा’ हे स्वप्न साकार करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. पर्यटन हंगामात वाढत्या कचऱ्याचा ताण ग्रामपंचायतींवर जाणवतो. यावर योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील.’’ या मोहिमेत मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पंचायत समिती अधिकारी आदी सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.