कोकण

पावस-पावसमध्ये आज २० देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

CD

rat21p22.jpg-
93051
पावस ः गणेशगुळे येथील कार्यशाळेमध्ये देवीच्या मूर्तीच्या रंगकामात मग्न असलेले कारागीर अल्हाद जाधव आणि सोहम कोटकर.
----------

पावसमध्ये आज २० देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन ; देवींच्या मंदिरांवर रोषणाई
पावस, ता. २१ ः नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा यादृष्टीने पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावस परिसरामध्ये घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्तिकारांची लगबग सुरू असून अखेरचा हात फिरवत असून प्राणप्रतिष्ठेसाठी देवीच्या मूर्ती सज्ज आहेत. पावस परिसरामध्ये २० देवींची प्रतिष्ठापना होणार आहे.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व उत्सव शांततेत साजरा करावा यासाठी परिसरातील नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम सिंग पाटील यांनी घेतली. बैठकीत प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी ओळखून व सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.
पावस पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावांमध्ये वीस देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सात ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे देवींच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई केली असून उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

चौकट
नेपाळी गुरख्यांची माहिती पोलिसांना द्या
या परिसरामध्ये आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे बागांच्या राखणीसाठी नेपाळी गुरख्यांची नेमणूक केली जाते. सध्या नेपाळमधील अनेक गुन्हेगार अनेक भागांमध्ये गुप्तपणे वावरत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात येत्या काही दिवसात बागेच्या राखणीसाठी ठेवलेल्या गुरख्यांची माहिती तातडीने मैत्री ॲपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यामध्ये जमा करावी. प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून तातडीने ही माहिती द्यावी. जेणेकरून कोणत्याही अनुचित प्रकारावेळी त्याचा उपयोग होईल. तसेच समुद्र संदेश लिंकची माहिती देऊन प्रत्येकाने त्याची अंमलबजावणी करावी, अशी आवाहन केले.

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानची दमछाक! साहिबजादा फरहानचे आक्रमण, पण शिवम दुबेने दिला ब्रेकथ्रू

Pune Fraud : ‘रॉ’च्या मिशनचे आमिष दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याला चार कोटींचा गंडा; धक्कादायक प्रकार उघड, चार वर्षांत कोट्यवधींचा व्यवहार

IND vs PAK: पाकिस्तानी फलंदाजानं आयसीसीचा मोठा नियम मोडला, कारवाई होणार? सामन्यात नेमकं काय घडलं?

GST Reform : देशातील जनता 'गब्बर सिंग टॅक्स' कधीही विसरणार नाही; मल्लिकार्जून खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Viral: एआयची कमाल! महिलेने ChatGPT वापरून $150,000 ची लॉटरी जिंकली, पण कशी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT