कोकण

मिरकरवाडा, मिऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

CD

rat21p20.jpg
93049
रत्नागिरी : मिऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी.
---------

मिरकरवाडा, मिऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम
रत्नागिरी, ता. २१ : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, शिवाजी हायस्कूल, जलजीविका संस्था, सागरी सीमा मंच, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट या संस्थांनी संयुक्तपणे मिऱ्या किनाऱ्यावर किनारपट्टीची स्वच्छता केली. आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त या मोहिमेचे आयोजन केले होते. सर्व संस्थांनी एकत्रित येऊन या किनाऱ्याची वर्षभर स्वच्छता राहण्याकरता कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरवले आहे.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे महत्व सांगितले. स्वच्छतेची शपथ दिली. समुद्रकिनारा स्वच्छतेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. या समुद्रकिनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक घरातील टाकाऊ वस्तू आढळून आल्या. गोळा केलेल्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
या वेळी सागरी सीमा मंचाचे स्वप्निल सावंत, संजीव लिमये, रंजन आगाशे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसीफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरीश धम्मगये, नरेंद्र चौगुले, वर्षा सदावर्ते, अर्चना सावंत, जाई साळवी, रमेश सावर्डेकर, किल्लेकर, कुबल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. नीलेश मिरजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे, मयुरी डोंगरे, मानसी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे ३० विद्यार्थी सहभागी झाले. शिवाजी हायस्कूलच्या ५७ विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जलजीविका संस्थेचे चिन्मय दामले, सहकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना हॅण्डग्लोज आणि पिण्याचे पाणी पुरविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

Pune: गोधड्या धुण्यासाठी गेले, पाण्यात अनेकजण अडकले, तरुणांनी धाडस दाखवलं अन्...; खडकवासलातील थरारक प्रसंग

IIM Centre: 'आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात';राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी; २०२६ पासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानची दमछाक! साहिबजादा फरहानचे आक्रमण, पण शिवम दुबेने दिला ब्रेकथ्रू

Pune Fraud : ‘रॉ’च्या मिशनचे आमिष दाखवून निवृत्त बँक अधिकाऱ्याला चार कोटींचा गंडा; धक्कादायक प्रकार उघड, चार वर्षांत कोट्यवधींचा व्यवहार

SCROLL FOR NEXT