93075
कुडाळ लक्ष्मीवाडी येथे
आजपासून नवरात्रोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः लक्ष्मीवाडी येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरामध्ये उद्यापासून (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सव कालावधीत रोज सायंकाळी ७.३० वाजता दत्तात्रय उपाध्ये (वालावल) यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता भजन व आरती असे नित्य कार्यक्रम होणार आहेत.
उद्या सकाळी १० वाजता घटस्थापना, रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी मंडळ-काळपवाडी यांचे भजन, १० वाजता फनिगेम्स स्पर्धा, २३ ला सायंकाळी ५ वादका नामस्मरण, रात्री ९ वाजता श्री नृहसिंह मंडळ (कुडाळ) यांचे भजन, १० वाजता कुंभारवाडा शाळेचे गोपनृत्य, २४ ला रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी मंडळ (लक्ष्मीवाडी) रोजी, १० वाजता दशावतार नाट्यप्रयोग ‘खेळ संचिताचा’, २५ ला रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी मंडळ (लक्ष्मीवाडी) यांचे भजन, २६ ला सकाळी १० वाजता ललिता पंचमी, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू, ५ वाजता फुगडी (भैरववाडी कुडाळ), रात्री ९ वाजता उमळकर मंडळ (कुडाळ), यांचे भजन, रात्री १० वाजता दशावतार नाट्यप्रयोग ‘यतिनाथ शिव हंस अवतारी’, २७ ला रात्री ९ वाजता गजानन मंडळ (मडवळवाडी) यांचे भजन, १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, २८ ला सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद, रात्री ९ वाजता महालक्ष्मी मंडळ(कांबळीवाडी) रोजी, १० वाजता दशावतार नाट्यप्रयोग ‘पुत्र नवसाचा’, २९ ला रात्री ९ वाजता श्री महालक्ष्मी मंडळ (वालावल) यांचे भजन , १० वाजता दशावतार नाट्यप्रयोग ‘महिमा वैष्णवी मातेचा’, ३० ला रात्री ८ वाजता आई केळबाई मंडळ (कुडाळ) यांचे भजन, ९ वाजता गरबारास ‘शुक्रतारा बिटस्, मालवण’, १ ऑक्टोरला सकाळी १० वाजता मोफत नेत्रतपासणी व निदान शिबिर, सायंकाळी ७ वाजता सद्गुरू संगीत मंडळ (कुडाळ) यांचे भजन, रात्री ९ वाजता अंबाबाईची आरती, ९.३० वाजता गरबारास, २ ला विजयादशमी निमित्त रात्री ८.३० वाजता आरती, ९ वाजता गरबारास आदी कार्यक्रम होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.