93108
स्वच्छ किनारे ही पर्यटनाची ताकद
नयोमी साटम ः मिठमुंबरी किनाऱी ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ ः आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त येथील पंचायत समिती व मिठमुंबरी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मिठमुंबरी येथील समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तालुक्यातील सागरी किनारे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असून, या ठिकाणी निरंतर स्वच्छता राहावी, यासाठी अशा प्रकारे विशेष नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत अप्पर पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी यावेळी व्यक्त केले.
यामध्ये सहभागी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी, मोहिमेत सहभागी सर्वांचे कौतुक करून अशाच प्रकारे सर्वांनी सहभागी होऊन समुद्र किनारे स्वच्छ राहतील यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. यावेळी मिठमुंबरी समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेमध्ये प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलिसपाटील दयानंद मुंबरकर, पंचायत समिती कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधीक्षक कुणाल मांजरेकर, विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर, तालुका अभियान व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी हेमंत हळदणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रीती ठोंबरे, ग्रामपंचायत अधिकारी सचिव श्रद्धा आळवे तसेच पंचायत समिती कर्मचारी, स .ह. केळकर महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रा. महेंद्र कामत, मिठमुंबरी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, कुणकेश्वर माध्यमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी व शिक्षक, पतन विभाग अधिकारी, कर्मचारी, उमेद अभियानातील सुमारे १४० महिला, यामध्ये मिठमुंबरी, इळये ,पाटथर व पडेल प्रभागातील महिला, मिठमुंबरी संस्थेचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ असे सुमारे ३०० जण सहभागी झाले. समुद्रकिनारी स्वच्छता करताना प्लास्टिक कागद, प्लास्टिक बाटल्या, थर्माकोल, समुद्रातून वाहुन आलेला अविघटनशील मानवनिर्मित कचरा असा सर्व कचरा एकत्र गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला. सूत्रसंचालन मुख्याध्यापक मधुसुदन घोडे यांनी केले. गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग शेडगे व सहकारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वछता मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. बाळकृष्ण गावकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.