कोकण

अभ्यासासह हवे व्यवहार ज्ञान

CD

93204

अभ्यासासह हवे व्यवहार ज्ञान

वीरसिंग वसावे ः कुडाळ इंग्रजी शाळेत दाखल्यांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ ः पुस्तकासोबत बाहेरचे जगदेखील पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार ज्ञान समजते. समाजात कसे वागावे, याचे आकलन होते, असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले.
सेवा पंधरवडानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत ‘शाळा तिथे दाखला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कमशिप्र मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. वसावे बोलत होते. यावेळी ४६ विद्यार्थ्यांना वय अधिवास आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण केले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मुख्याध्यापिका मुमताज शेख उपस्थित होत्या. एकूण ४६ विद्यार्थ्यांना ४ जातीचे दाखले आणि ४२ वय अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह तहसीलदार वसावे, नायब तहसीलदार जाधव यांच्या हस्ते हे दाखले स्वीकारले.
तहसीलदार वसावे यांनी शासनाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थी आणि पालकांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रायोगिक ज्ञान घ्यावे. त्याचा समाजात वावरताना चांगला उपयोग होतो, असे सांगितले. तालुक्यात २२५ जिल्हा परिषद आणि ३८ खासगी शाळा आहेत. त्यामध्ये कुडाळ इंग्लिश मीडियम ही केवळ दोन दिवसांत कागदपत्र पूर्ण करून ४६ विद्यार्थ्यांना दाखले मिळवून देणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. त्याबद्दल तहसीलदार वसावे यांनी शाळा व व्यवस्थापनाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका शेख यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: काश्मीरची लेडी सिंघम मैदानात! एन्काऊंटर स्पेशालिस्ट IPS शाहिदा स्फोटाच्या स्थळी दाखल

Tata Safari अन् Harrier फेसलिफ्टची लॉन्च डेट कंफर्म; 'या' दिवशी मार्केटमध्ये पदार्पण करणार दमदार कार, तेही अगदी परवडणाऱ्या दरात

Syncope Symptoms: अभिनेता गोविंदाला झालेला सिंकोपी आजार नेमका काय? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Latest Marathi Breaking News Live : नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार सज्ज! पाचपट भाविकांची अपेक्षा, २० हजार कोटींची कामे सुरु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CA After 12th: CA बनण्यासाठी १२वी नंतर काय करावं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT