कोकण

आचरा वाचन मंदिरास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

CD

swt229.jpg
93212
आचरा ः येथील रामेश्वर वाचनालयाचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंचा ज्ञानेश्वरी भेट देत सन्मान केला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवर.

आचरा वाचन मंदिरास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
आचरा, ता. २५ः येथील रामेश्वर मंदिरास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी रामेश्वर वाचन मंदिरास भेट देत वाचनालयाच्या वाचन संस्कृती वाढीसाठी सुरु असलेल्या उपक्रमांबद्दल ग्रंथसंपदेबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी त्यांना ज्ञानेश्वरी भेट देत त्यांचा सन्मान केला. दुर्मिळ ग्रंथसंपदा आणि सांस्कृतीक जोपासना करणारे हे वाचनमंदिर असल्याचे गौरवोद्गार यावेळी जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी काढले.
त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सरपंच जेरोन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी,देवस्थान समिती सदस्य संजय मिराशी, वाचन मंदिरचे सहाय्यक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण उपस्थित होते.
--------------------
swt2210.jpg
93198
वायंगणीः येथील ज्ञानदीप संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले.

वायंगणी ‘ज्ञानदीप’च्या नव्या सदस्यांचे स्वागत
आचरा, ता. २५ ः वायंगणी ज्ञानदीप संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सदा राणे यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांची तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी चंद्रकांत उर्फ बाबू हडकर यांची निवड करण्यात आली. संस्थेची सभा वायंगणी हायस्कूल येथे झाली. यावेळी सचिवपदी वैभव जोशी, खजिनदारपदी अॅड. समृद्धी आसोलकर, सदस्य दिपक सुर्वे, मनोहर वायंगणकर, सुरेश सावंत, संतोष वायंगणकर, दिपक सावंत, विलास सावंत, उदय दुखंडे, अशोक सावंत, सुशांत आसोलकर, शंकर उर्फ बाळू वस्त, सुंदर सावंत, चंद्रकांत हडकर यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात

SCROLL FOR NEXT