swt2211.jpg
93199
सावंतवाडी ः रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे अनंत चिंचकरचा सत्कार करताना मान्यवर.
सावंतवाडी रोटरी क्लबतर्फे
अनंत चिंचकरचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सावंतवाडीचे नाव उज्वल करणाऱ्या सार्जंट अनंत चिंचकर याचा रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे सत्कार करण्यात आला. अनंत हा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा विद्यार्थी असून, अलीकडेच दिल्ली येथे लेफ्टनंट जनरल गुरप्रीत सिंग यांच्या हस्ते त्याने सुवर्णपदक स्वीकारले.
या सत्कार प्रसंगी रोटरी अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ भांबुरे, सचिव सीताराम तेली, रोट्रॅक्ट अध्यक्ष सिद्धेश सावंत, राजेश रेडीज, सुभाष पुराणिक, विनया बाड, साई हवालदार, सुबोध शेलटकर, श्री. जिगजिनी, काका परब, भावेश भिसे आदी उपस्थित होते. अनंतच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सावंतवाडीत आनंदाचे वातावरण असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
....................
swt2212.jpg
93200
आकेरी ः चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आकेरी शाळेत विविध स्पर्धा
सावंतवाडी, ता. २५ ः आकेरी क्रमांक १ या प्रशालेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यासाठी बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेच्या अध्यक्षस्थानी हार्दिक सावंत होते. बालसभेत पंतप्रधान मोदी यांना टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यानिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.