rat22p6.jpg-
93189
रत्नागिरी : जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी आणि किल्ले रत्नदुर्गवरील श्री भगवती देवी.
---
जिल्ह्यात देवीचा जागर,
बाजारपेठाही गजबजल्या
वाजतगाजत आगमन मिरवणुका; ५०१ ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : घटस्थापना, दसरा, दिवाळीचे उत्सवी दिवस आजपासून देवीची प्रतिष्ठापना करून सुरू झाले. नवरात्रोत्सवामुळे बाजारपेठेलाही झळाळी आली आहे. सकाळी देवीची वाजतगाजत आगमन मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी दुर्गामाता पूजन करण्यात आले. नवरात्रोत्सवात विविध मंडळांनी रास दांडिया नृत्य स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यात ५०१ ठिकाणी दुर्गामाता प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात ४३६ सार्वजनिक व ६५ खासगी आहेत. १९ हजार ३१५ ठिकाणी घरगुती घट स्थापन करण्यात आले. ४२४ घट सार्वजनिक आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती, आडिवरे येथील महाकाली, काजरघाटी येथील महालक्ष्मी, गोवळकोटची करंजेश्वरी, गुहागरची दुर्गादेवी, तुरंबवची शारदादेवी अशा सर्वच मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला सुरवात झाली. उत्सवकाळात दररोज कीर्तन, आरत्या, भोवत्या आदींसह सप्तशती पठण, व्याख्याने यांचेही आयोजन केले आहे. तसेच गरबा, दांडिया, जागरण, गोंधळ आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरे, देवी मंदिर परिसर, सार्वजनिक मंडळे आणि घराघरांत मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्र म्हणजे देवीची उपासना, भक्ती आणि जागरणाचा सोहळा. महालक्ष्मी, दुर्गादेवी, नवदुर्गा मंदिरांमध्ये सकाळपासून विशेष पूजाअर्चा, घटस्थापना, कलशपूजन, देवींच्या मूर्तींची सजावट यास सुरवात झाली. आकर्षक मंडप, रांगोळ्या, विद्युत सजावट आणि देवींच्या पारंपरिक व आधुनिक संकल्पनेवर आधारित मंडप उभारण्यात आले आहेत. पोलिस विभागाकडून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आल्या असून, सर्वत्र बंदोबस्त ठेवला होता.
कोट
रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरवात झाली. देवीला रूपं लावण्यात आलं आहे. रूढी-परंपरेप्रमाणे मंदिरात उत्सव साजरा होणार आहे तसेच भजन, कीर्तन मंडळे, महिलांची भजने मंदिरात होणार आहेत. मानकरी, गावकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतील.
- मनू गुरव, भैरी देवस्थान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.