-rat२२p७.jpg-
२५N९३१९०
रत्नागिरी ः जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे.
---
ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
भाऊसाहेब गलांडे ः बँक, रुग्णालयांसाठी सूचना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः बँक, रुग्णालय तसेच शासकीय कार्यालयात गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहायला लागू नये, त्यांच्याकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी, अशी सूचना संबंधितांना पत्रव्यवहार करून कळवावी, असे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी सांगितले आहे.
जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला समाजकल्याण साहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, इतर मागास बहुजन कल्याण साहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड, बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे, साहाय्यक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा परिविक्षाधिकारी ए. बी. शिंदे, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ आदी उपस्थित होते. घाटे यांनी विषय वाचन केले. थरवळ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सांगितल्या.