rat22p16.jpg-
93222
कुडाळ : कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षपदी नमिता कीर यांची फेरनिवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना डॉ. प्रदीप ढवळ आणि मंगेश मस्के व पदाधिकारी.
-----------
कोमसापच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची फेरनिवड
नूतन केंद्रीय कार्यकारिणी जाहीर : उद्योगमंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक विश्वस्त मंडळावर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी नमिता कीर यांची व कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेरनिवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी २०२५ ते २८ या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार, विश्वस्त मंडळावर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक यांची निवड करण्यात आली.
कुडाळ येथे मराठा समाज मंडळाच्या सभागृहात केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी उपस्थित केंद्रीय कार्यकरिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कीर व ढवळ यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या विचारधारेने आम्ही निश्चितपणे साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम करू, असे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ म्हणाले. बैठकीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कर्जत, पनवेल, नवी मुंबई आदी सर्व भागांतील जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी- विश्वस्त उदय सामंत, संजय केळकर, अनुप कर्णिक, प्रा. एल. बी. पाटील, रेखा नार्वेकर. कार्यवाह माधव अंकलगे, दीपा ठाणेकर, प्रकाश दळवी (रत्नागिरी), सदस्य मंगेश मस्के, रूजारिओ पिंटो, आनद शेलार, बाळासाहेब लबडे, संजय गुंजाळ, गणेश कोळी, मोहन भोईर, रूपचंद भगत, विद्या प्रभू, जगदीश भोवड, तुकाराम कांदळकर, योगेश जोशी, प्रवीण दवणे, सुहास राऊत.
चौकट
विविध समित्यांचे प्रमुख
केंद्रीय साहित्य संमेलन समिती - केंद्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, झपूर्झा प्रकाशन समिती- नमिता कीर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन व पुस्तकांचे गाव समिती- गजानन पाटील, महिला साहित्य संमेलन समिती- वृंदा कांबळी, युवाशक्ती- दक्षिण कोकण (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे) अरूण मोर्ये. नाट्य समिती- डॉ. अनिल बांदिवडेकर, किरण येलये, मंदार टिल्लू, अमेय धोपटकर, समन्वय समिती-रवींद्र आवटी, जयेंद्र भाटकर, अनंत वैद्य, अशोक बागवे, चंद्रमोहन देसाई, विधी व कायदा समिती-अॅड. स्वाती दीक्षित, लेखापरीक्षण समिती मधुकर टिळेकर, कोमसाप भवन बांधकाम समिती-गजानन पाटील, माधव अंकलगे, प्रकाश दळवी, संदीप वालावलकर.
कोट
मला अध्यक्षपदी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. निश्चितपणे कोकण मराठी साहित्य परिषद अधिक जोमाने वाढवण्यात येईल. युवाशक्तीला बळ देण्याचे कामही केले जाईल.
- नमिता कीर, अध्यक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.