कोकण

चिपळूण-टेरव रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आत्मदहन

CD

RATCHL223.JPG-
93345
चिपळूण ः खेर्डी-टेरव कामथे रस्त्याची झालेली चाळण.
-------------------
टेरव रस्त्याची दुरुस्ती
न झाल्यास आत्मदहन
चिपळूण, ता. २३ ः तालुक्यातील खेर्डी-टेरव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यापूर्वी मागणी करूनही खड्डे भरले नाहीत. नवरात्रोत्सवात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढतो. त्यामुळे या मार्गावरील खड्डे भरून रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा टेरव सरपंच किशोर कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे.
सरपंच कदम यांनी सार्वजनिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार, खेर्डी-टेरव-कामथे या राज्य मार्ग १०९ च्या दुरुस्तीबाबत दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. बैठकीत पावसाळ्यानंतर रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप रस्ता दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. टेरव गावास शासनाच्या पर्यटन विभागाचा ‘ब’ तसेच ‘क’ दर्जा मिळाला आहे. टेरव येथे नवरात्रोत्सव कालावधीत भवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. जिल्ह्यासह परजिल्ह्यांतूनही येथे भाविक येत असतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. दुरुस्ती न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच किशोर कदम यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New York पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा ताफा थांबवला; Donald Trump यांना फोन केला अन्..., काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: भाजप आणि काँग्रेस आक्रमक, एकमेकांविरोधात गुन्हा दाखल; साडी प्रकरणाने राजकीय वातावरण तापले

Sharad Pawar : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभा करा; बळीराजा वाचला नाही, तर राज्यावर मोठे संकट येईल

Latest Marathi News Live Update : खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर

Nitin Gadkari: शिक्षण देणे काळाची गरज, विद्यापीठांनी ज्ञानावर अधिक भर द्यावा, नितीन गडकरींचे आवाहन

SCROLL FOR NEXT