कोकण

पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक निवासाविना

CD

-rat२३p१८.jpg-
P२५N९३५६७
रत्नागिरी ः ऐतिहासिक ‘डीएसपी’च्या बंगल्याची सुरू असलेली दुरुस्ती.
---
ऐतिहासिक ‘डीएसपी बंगल्या’ची दुरुस्ती
वारशाचे होणार जतन ; अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक निवासाविना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : जिल्ह्याची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे पोलिस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक हे दोन्ही उच्च अधिकारी सध्या हक्काच्या शासकीय निवासस्थानांविना आहेत. रत्नागिरीतील ऐतिहासिक ‘डीएसपी बंगला’ दुरुस्तीसाठी बंद असल्याने पोलिस अधीक्षकांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे तर अप्पर पोलिस अधीक्षकांना गळक्या खोल्यांमध्ये दिवस काढावे लागत आहेत.
शहरातील ‘डीएसपी बंगला’ किंवा जिल्हा पोलिस अधीक्षक निवासस्थान सव्वाशे वर्षांपूर्वीचा आहे; परंतु सध्या तो दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहे. ब्रिटिशांनी १८८५ मध्ये ब्रह्मदेशचा राजा थिबा याला नजरकैदेत ठेवण्यासाठी उभारलेल्या इमारतींपैकी ही एक इमारत आहे. २५ वर्षे राजा थिबा येथे वास्तव्यास होता, त्यामुळे या बंगल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या बंगल्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणात गळती होत होती आणि फर्निचरही जुने झाले होते. सध्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या दुरवस्थेची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार, आता या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण सुरू झाले आहे. या दुरुस्तीमुळे या महत्त्वाच्या वारशाचे जतन होण्यास मदत होणार आहे; परंतु यामध्ये पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बगाटे यांना त्यामुळे भाड्याच्या बंगल्यामध्ये राहावे लागत आहे.
पोलिस अधीक्षकांप्रमाणेच अप्पर पोलिस अधीक्षकांनाही निवासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांना पोलिस उपनिरीक्षकांच्या जुन्या आणि गळक्या खोल्यांमध्ये राहावे लागत आहे. पावसाळ्यात तर या खोल्यांमध्ये गळत असल्याने त्यांना अक्षरशः बादल्या लावून दिवस काढावे लागत आहेत, ज्यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होत आहे.
----
चौकट
हक्काचे निवासस्थान मिळणार का?
जिल्ह्याची सुरक्षाव्यवस्था सांभाळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच अशा प्रकारच्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘डीएसपी बंगल्या’चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून दोन्ही अधिकाऱ्यांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Rain : कोलकातामध्ये पावसाने मोडला ३७ वर्षांचा विक्रम, रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे- विमाने रद्द, ८ जणांचा मृत्यू

Arshdeep Singh: एक ही सरदार, पाकिस्तानी गार! अर्शदीपने Haris Rauf च्या 'विमान' सेलिब्रेशनचं काय केलं ते पाहा... Viral Video

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

SCROLL FOR NEXT