जात प्रमाणपत्र
पडताळणी मोहीम
रत्नागिरी ः जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत २ ऑक्टोबरपर्यंत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वत: किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी समिती कार्यालयात त्रुटी पूर्ततेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीईटी, क्लॅट व जेईई इत्यादी परीक्षा दिल्या आहेत. त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समिती कार्यालयात अर्ज दाखल केला आहे; मात्र त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बारावी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या संबंधित महाविद्यालयामार्फत स्वीकारले जातील. पदविकेच्या तृतीय वर्षात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे जात पडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्जही स्वीकारले जाणार आहेत.
भूमी अभिलेखची
शुक्रवारी लोकअदालत
रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्यातर्फे अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोकअदालत २६ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात आयोजित केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एस. एस. इंगळी यांनी केले आहे. लोकअदालतीमध्ये जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडील प्रलंबित अपील प्रकरणावर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी अपिलामधील दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यास मदत करून अपील प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढली जातील. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन पक्षकारांनी उपस्थित राहावे जेणेकरून प्रकरणाचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल.
विज्ञान नाट्यस्पर्धेत
‘घोसाळकर’ प्रथम
सावर्डे ः राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाअंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धेत भाईशी घोसाळकर हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे आयोजन ताम्हाणे हायस्कूल येथे करण्यात आले आहे. विज्ञान नाटिकेसाठी दिलेल्या मानवकल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांतर्गत ‘डिजिटल भारत : जीवन सक्षमीकरण’ हा विषय निवडण्यात आला होता. आधुनिक भारताचे स्वप्न दाखवण्याचे काम या नाटिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या नाटिकेत अर्णवी कानाल, सिद्धी उजगावकर, नीरजा बोबले, श्रवण हरेकर, वेदांत सावरटकर, देवान किंजळकर, संग्राम ओकटे, विराज वारोशे, आयुष ओकटे, गौरव गुरव या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.