कोकण

नळाच्या पाण्यातून निघाले चक्क किडे

CD

swt232.jpg
93483
सावंतवाडीः येथील सालईवाडीमध्ये नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्यात किडे आढळले आहेत.

पाण्याऐवजी किड्यांचा पुरवठा !
सावंतवाडीतील सालईवाडा परिसरात धक्कादायक प्रकार; यंत्रणेकडून डोळेझाक; नागरिक हतबल
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः शहरात अनेक भागात कमी दाबाने तसेच अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले असतानाच आता पाण्यातून किडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांत शहरातील पाणीपुरवठ्याबाबत प्रश्‍न चढत्या क्रमाने वाढत आहेत; मात्र पालिकेची यंत्रणा याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भरमसाठ पाणी बिल भरूनही पुरवठ्याबाबतच्या समस्या वाढत आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने वाली कोणीच नसल्याने संताप वाढत आहे. शहरातील सालईवाडा भागात पिण्याच्या पाण्यातून किडे आल्याचा हा प्रकार समोर आला असून या आधी अशाच प्रकाराबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली नसल्याचे अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सांगितले.
जिल्ह्यात सावंतवाडी शहरातील पालिकेची यंत्रणा चांगली मानली जायची. विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी प्रशासकीय घडी बर्‍यापैकी बसवली होती. त्यानंतर या पदावर आलेल्या पल्लवी केसरकर, श्‍वेता शिरोडकर, बबन साळगावकर, संजू परब आदींच्या कार्यकाळात ही यंत्रणा तशीच सक्षम राहिली; मात्र पालिकेवर प्रशासकीय राज सुरू झाल्यानंतर यंत्रणेवरची पकड सुटल्याची स्थिती आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विविध प्रश्‍नांबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. शहराला होणारा पाणीपुरवठा या समस्यांबाबत आघाडीवर आहे. हे प्रश्‍न मांडूनही प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे आणि कार्यवाही होत असल्याने संताप वाढत आहे.
सावंतवाडी शहर उंच-सखल भागात वसलेले आहे. येथे प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचण्याच्या दृष्टीने आतापर्यंत योजना आणि नियोजन आखण्यात आले; मात्र गेल्या दोन वर्षांत अनेक भागात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बरेचजण केवळ या पालिकेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पालिकेच्या नळाचे पाणी ठरावीक वेळी येते. त्यामुळे नागरिक हे पाणी छतावर किंवा उंच ठिकाणी टाक्यांमध्ये साठवतात. गेल्या दीड-दोन वर्षांत पाईप फुटण्याबरोबरच चुकीच्या नियोजनामुळे अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे टाक्यांमध्ये पाणी चढत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे.
याबाबतची तक्रार केल्यास ‘आम्ही आमच्या मीटरपर्यंत पाणी आल्याचे दाखवले की आमची जबाबदारी संपली,’ असे उत्तर दिले जाते. प्रत्यक्षात या पाण्याचा दाब पुरेसा नसेल तर मीटरकडे पहाटे उटून पाण्याची भांडी भरून ठेवायची का? या प्रश्‍नाचे उत्तर त्यांच्याकडे नसते किंवा त्याचे देणे-घेणेही यंत्रणेला नसल्याचे चित्र आहे. बऱ्याचदा दोन दोन दिवस पाणीच येत नसल्याचे प्रश्‍नही अनेक भागात आहेत. नागरिक या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संताप वाढत आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्‍न स्थानिकांना सतावत आहे.
एकूणच अशी परिस्थिती असताना पाण्याच्या नळातून चक्क किडे येत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी समोर आणला. सालईवाडा येथील कंटक पाणंद येथे आज हा प्रकार घडल्याचे श्री. बरेगार यांनी पत्रकात म्हटले आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, या आधी २५ जुलैला कंटक पाणंद येथील निवासस्थानी पालिकेमार्फत होणाऱ्या पाणी योजनेच्या पुरवठ्यातून किडे येत असल्याचा प्रकार घडला होता. याबाबतची तक्रार पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे त्यादिवशी केली होती. त्या दिवशी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रमुखांनी मोबाईलवर संपर्क साधून आज संध्याकाळी पाणी येते वेळी व बंद होते, त्यावेळी आमचे कर्मचारी येऊन पाणी नमुने घेतील, असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी येऊन नमुने घेऊन गेले व आपण दिलेल्या पाण्यातील आढळलेले किडे सुध्दा घेऊन गेले होते; परंतु त्याचे पुढे काय झाले अथवा आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, याबाबत आजपर्यंत कळवलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी पुन्हा नळपाणी योजनेतील पाणी नळाद्वारे आणले असता त्यामध्ये किडे वळवळताना आढळले. त्याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मेलद्वारे कळविले आहे. जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने काय कार्यवाही करतात हे कळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.
याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख प्राजक्ता कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्काचा प्रयत्न केला असता त्यांनी तो उचलला नाही. पालिकेत संपर्क साधला असता पाणीपुरवठा विभागाचे श्री. पोईपकर यांना जोडून देण्यात आले. त्यांनी बरेगार यांच्या तक्रारीबाबत पाणी नमुने घेतले जातील, असे उत्तर दिले; मात्र याआधी केलेल्या तक्रारीवेळी पाणी नमुने घेऊनही श्री. बरेगार यांना पुढे काय कार्यवाही झाली, हे कळविले नसल्याबाबतच्या प्रश्नावर ते निरुत्तर झाले.

कोट
सावंतवाडी पालिकेकडे तक्रार करूनही थातूरमातूर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याच्या दिशेने काहीच केले जात नाही. यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
- जयंत बरेगार, नागरिक

कोट
सावंतवाडी नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना त्याकडे स्वच्छतेच्या बाबतीत गांभीर्याने पाहिले जाते. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो, त्या ठिकाणी ‘टीसीएल’ची मात्रा प्रमाणात दिली जाते, परंतु असे असताना सालईवाडा भागात पाण्यात अळ्या आढळल्याची तक्रार असल्यास आपण त्या बाबतीत लक्ष घालून त्याची चौकशी करू. आवश्यक त्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देऊ; मात्र अद्याप तरी आपल्याकडे याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार नाही.
- हेमंत निकम, नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी, सावंतवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Rain : कोलकातामध्ये पावसाने मोडला ३७ वर्षांचा विक्रम, रस्ते वाहतूक ठप्प; रेल्वे- विमाने रद्द, ८ जणांचा मृत्यू

Arshdeep Singh: एक ही सरदार, पाकिस्तानी गार! अर्शदीपने Haris Rauf च्या 'विमान' सेलिब्रेशनचं काय केलं ते पाहा... Viral Video

Diwali Gifts: सरकारी पैशांचा वापर करून दिवाळी भेटवस्तू देण्यावर बंदी, अर्थ मंत्रालयाकडून सर्व मंत्रालये आणि विभागांना आदेश

Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर ८ जणांचा सामूहिक अत्याचार; नातेवाईकाने मित्रांना बोलावले अन्...

Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी २३ कक्षांची स्थापना

SCROLL FOR NEXT