swt2321.jpg
93614
सावंतवाडीः येथील पर्यटन सुविधा केंद्राच्या परिसराची पालिकेकडून स्वच्छता करण्यात आली.
पर्यटन केंद्राने घेतला मोकळा श्वास
सावंतवाडीत स्वच्छताः सकाळच्या बातमीचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ः येथील पालिकेच्या पर्यटन सुविधा केंद्राच्या दुरावस्थेबाबत ‘सकाळ’ने ‘पर्यटन केंद्र की जनावरांचा तळ’ या मथळ्याखाली वस्तुस्थिती समोर आणली होती. त्या बातमीनंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने अखेर त्या इमारतीच्या परिसरात वाढलेली गवत छाटले आहे. त्यामुळे या इमारतीने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे.
सावंतवाडी शहरातील पर्यटन वाढीसाठी तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी शहराच्या मुखावरच पर्यटन सुविधा केंद्र हा प्रकल्प उभारला होता. २२ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा प्रारंभ झाला होता. परंतु, पर्यटन वाढीसाठी म्हणावा तसा या प्रकल्पाचा वापर कधीच होताना दिसून आला नाही. अलीकडे तर वर्ष दीड वर्ष हा प्रकल्प पूर्णतः बंद असल्याने वापराविना या प्रकल्पाची पूर्णतः वाताहात झाली होती. प्रकल्पाचे लोखंडी छप्पर, आतील फर्निचर तसेच अन्य साहित्य पूर्णपणे खराब झाले आहे.
छप्पर मोडकळीस आल्याने पावसाचे पाणीही आतमध्ये येत असल्याने पूर्ण इमारतीमध्ये अस्वच्छता पसरली होती. या बंद इमारतीचा आसरा पावसाळ्यात तसेच आत्तासुद्धा मोकाट जनावरांनी घेतला होता. त्या ठिकाणी त्यांनी आपला तळच ठोकला होता. शहाराच्या प्रवेशाद्वारावरील हे पर्यटन सुविधा केंद्र हे सावंतवाडी शहराच्या सौंदर्याला बाधा ठरत होते.
‘सकाळ’ने दोन दिवसांपूर्वीच यावर प्रकाश टाकताना वस्तुस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. ‘पर्यटन केंद्र की जनावरांचा तळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. एकूणच यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांना राबवून पर्यटन केंद्राच्या परिसरात वाढलेले गवत स्वच्छ करून घेतले. त्यामुळे या पर्यटन सुविधा केंद्राने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे.
चौकट
नागरिकांमधून समाधान
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्राची झालेली वाताहात आणि त्याकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाबाबत ‘सकाळ’ने वाचा फोडताच प्रशासनाने पर्यटन सुविधा केंद्राचा परिसर स्वच्छ केला. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेतली गेल्याने नागरिकांनी वृत्तांकनाचे कौतुक करत पर्यटन सुविधा केंद्राचा परिसर स्वच्छ झाल्याबाबत समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.