swt2316.jpg
93639
विलास देसाई, संभाजी रावराणे, अरविंद पेडणेकर, विलास नावळे, महेश संसारे.
वैभववाडी खरेदी-विक्री
संघाचे पुरस्कार जाहीर
प्रमोद रावराणेः शुक्रवारी सहकार मेळाव्यात वितरण
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २३ः वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने शेती, फळपीक आणि शेतीपूरक व्यवसायांकरिता देण्यात येणारे पुरस्कार संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (ता. २७) आयोजित सहकार मेळाव्यात करण्यात येणार आहे.
याबाबतची रावराणे यांची पत्रकार परिषद येथील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी त्यांच्यासोबत बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील, उपाध्यक्ष अंबाजी हुंबे, सीमा नानीवडेकर, महेश रावराणे, पुंडलिक पाटील, उज्वल नारकर, व्यवस्थापक सिध्देश रावराणे आदी उपस्थित होते.
श्री. रावराणे म्हणाले, "तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून शेती, बागायती आणि शेतीपूरक व्यवसायात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येतात. शेतीत काम करणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यावे, इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, हा त्यामागचा हेतू आहे. पुरस्कार निवड करताना काही निकष निश्चित करण्यात आले होते. त्या निकषानुसार उत्कृष्ट भातपीक उत्पादक-संभाजी रावराणे (सांगुळवाडी), उत्कृष्ट काजू उत्पादक शेतकरी-विलास देसाई (एडगाव), उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी-विलास नावळे (लोरे), प्रयोगशील शेतकरी-गौरी परब (तिथवली), उत्कृष्ट पशुपालक-अरविंद पेडणेकर (नाधवडे), भरडधान्य उत्पादक-गोपाळकृष्ण बचतगट समूह (मांगवली) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे."
येथील मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात शुक्रवारी (ता. २७) सहकार मेळावा होणार आहे. तत्पूर्वी तालुका खरेदी-विक्री संघाची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सहकार मेळाव्याला पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक दिलीप रावराणे उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्याला सहकारात काम करणाऱ्या तालुक्यातील सर्व जाणकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रावराणे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.