rat२३p१६.jpg-
P२५N९३५४५
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्रद्धा कळंबटे यांना स्वरूपयोगिनी पुरस्कार प्रदान करताना जयंतराव देसाई. डावीकडून ऋषिकेश पटवर्धन, विवेक भावे आदी.
---------
सामाजिक भानातून समाजासाठी कार्य
श्रद्धा कळंबटे ः स्वरूपयोगिनी पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : मी ठरवून काही केले नाही; पण समोर समाजातील गरजा दिसत गेल्या आणि मी काम करत गेले. बालसुधारगृहातील मुलांशी संवाद साधावा, झोपडपट्टीमध्ये शिकवावे, स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष काम करावे, निराधारांची सोय करून द्यावी, समुपदेशन करावे, जे जमेल ते सर्वांच्या सहकार्याने करत गेले. त्यामुळेच हजारो प्रकरणे सोडवली. आजचा पुरस्कार हा स्वामी स्वरूपानंदांचा प्रसाद आहे, असे भावुक उद्गार सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांनी काढले.
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्यावतीने स्वरूपयोगिनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या बोलत होत्या. सेवामंडळातर्फे वरचीआळी येथील अध्यात्म मंदिर येथे स्वरूपयोगिनी पुरस्काराचे वितरण झाले. या वेळी कळंबटे यांना स्वामी स्वरूपानंद सेवामंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांनी स्वरूपयोगिनी पुरस्काराने देऊन सन्मानित केले. सन्मानपत्राचे लेखन आणि वाचन राजू जोशी यांनी केले. सत्काराला उत्तर देताना कळंबटे म्हणाल्या, जे जमेल ते सर्वांच्या सहकार्याने करत गेले. गरजेप्रमाणे आधार आणि सल्ला देऊन ज्यांना मी मार्गी लावले अशा प्रकरणांची संख्या आज हजारच्यावर गेली आहे. या कामात मला कुमुदताई रेगे, पेवेंसारखे अनेक स्थानिक डॉक्टर, विनय परांजपे आणि आजही माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक मैत्रिणींची साथ मिळाली. सामाजिक भान मला माझ्या आईने संस्कारातून दिले. निराधार गरजू लोकांना माझ्यापर्यंत आणा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांचे हे अनुभव प्रेरक होते. कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी आभार मानले. स्वामी स्वरूपानंद रचित वरप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विवेक भावे, वैद्य यांचेही सहकार्य लाभले.
चौकट १
वेणाबाईंचे चरित्र उलगडले
नवरात्रीच्या पहिल्या तीन माळेतील पहिले व्याख्यानपुष्प प्रा. अंजली बर्वे यांनी ओवले. समर्थ शिष्या वेणाबाईंचे चरित्र उलगडताना त्यांनी तत्कालीन समाजचित्रही उभे केले. माणुसकीला कलंकित करणाऱ्या दुष्ट रूढींना झुगारून, जननिंदा पचवून भक्तिमार्गावर ठाम उभी राहणारी विधवा वेणा, तिला मठाधिपती करणारे समर्थ आणि ती जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी कवयित्री वेणा, असा तिचा सर्व जीवनप्रवास अंजली बर्वे यांनी ओघवत्या वाणीने जिवंत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.