कोकण

खारेपाटण महाविद्यालयात प्रवेश मर्यादा वाढीस मंजुरी

CD

swt2325.jpg
93671
खारेपाटण ः मंगेश गुरव यांचा सत्कार करताना मान्यवर.

अकरावी प्रवेश मर्यादा वाढीस मंजुरी
तळेरे, ता. २३ : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या एस.एन.एम. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशाची मर्यादा वाढवण्यासाठी कोल्हापूर शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे या भागात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे शिक्षण संस्थेने म्हटले आहे. यावर्षी पासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. खारेपाटण कॉलेजमध्ये कणकवली, राजापूर, वैभववाडी, देवगड आदी तालुक्यांमधून विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येतात. यावर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दूर अंतरावरील कॉलेज मिळाल्याने गैरसोय होत होती. पालकांना आर्थिक भुर्दंड बसत होता. याबाबत पालकांनी गुरव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. गुरव यांनी महाविद्यालयाची प्रवेश मर्यादा वाढवण्यासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. याबद्दल खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने गुरव यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, ज्युनिअर कॉलेजचे प्रा. संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
..................
''टॉप क्लास'' शाळांच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः जिल्ह्यातील टॉप क्लास विद्यालयांच्या याद्या या कार्यालयास प्राप्त झालेल्या असून यादीतील २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यालयांनी बोर्ड परीक्षेमध्ये सतत १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण असा निकाल प्राप्त केलेला आहे, अशा विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ''नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर'' सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज मुख्याध्यापक यांच्यामार्फत संबंधित पोर्टलवर भरण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Exam: प्रतिक्षा संपली! सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या

तू त्याला मिठी का मारतेस? धनश्री वर्मासाठी तुटतोय अरबाज पटेलचा जीव; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणतात- हा निक्कीचा BF आहे ना?

Raigad Crime: रायगडमध्ये बनावट नोटा! मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; आतापर्यंत तिघांना अटक

Asia Cup, IND vs BAN: फायनलसाठी टक्कर! बांगलादेशचा कर्णधारच सामन्यातून बाहेर, भारताच्या संघात बदल झाले? पाहा प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली

SCROLL FOR NEXT