कोकण

-13 जनावरांची अवैध वाहतूक रोखली

CD

-rat२३p३८.jpg-
२५N९३६९७
राजापूर ः गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयितांवर कारवाई करणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक
------
जनावरांची अवैध वाहतूक रोखली
दोघे ताब्यात ; एका संशयिताचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक आणि कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तालुक्यातील पाचल येथे धडक कारवाई केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका वाहनांमधून १३ गोवंशाची अवैध वाहतूक करताना दोन संशयितांना ताब्यात घेतले असून आणखी एकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या कारवाईमध्ये एका वाहनासह सुमारे १२ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करताना १३ जनावरांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या महिनाभराच्या कालावधीतील राजापुरातील ही दुसरी कारवाई ठरली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक सोमवारी (ता.२२) लांजा उपविभागात गस्त घालत असताना त्यांना पाचल-जवळेथर रस्त्याने गगनबावडा घाटमार्गे अवैध व बेकायदेशीरपणे गोवंश वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, पोलिसांनी पाचल येथे वाहनांची तपासणी सुरू केलेली असताना या ठिकाणी आलेल्या एका वाहनाची तपासणी केली. त्या वेळी या वाहनाच्या हौद्यामध्ये १३ गोवंश जातीची जनावरे यांना दोरीच्या सहाय्याने दाटीवाटीने जवळजवळ बांधलेली आढळून आली. पोलिसांनी या वाहनांच्या चालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही परवाना नाही, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्‍यांकडून जनावरांची तपासणी केली नसल्याची माहिती दिली. या प्रकरणी सलमान मुस्ताक बलबले (वय ३५, रा. बलबले मोहल्ला, राजापूर), संजय दत्ताराम पाटणकर (४८, रा. कुंभवडे, राजापूर) यांच्या केलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी ही जनावरे काझी मोहम्मद उर्फ पांड्या (रा. तळगाव, कोंड्ये) याच्याकडून आणल्याची माहिती दिली. या प्रकरणी तिघा संशयितांविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये दोन संशियातांसह एक वाहन ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT