kan241
93801
कनेडी ः येथील कॅरम स्पर्धेत नरडवे हायस्कूलच्या सृष्टी कदम आणि मुग्धा पवार हिने यश संपादन केले.
नरडवे हायस्कूलचे
कॅरम स्पर्धेत यश
कणकवली, ता. २४ ः तालुक्यातील कनेडी येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा झाली. यात नरडवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यात १४ वर्षे मुलींच्या गटात सृष्टी भिकाजी कदम हिने पाचवा आणि मुग्धा निलेश पवार हिने सहावा क्रमांक मिळविला. या दोन्ही मुलींची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक व्ही. के. खंडवी यांचे मार्गदर्शन लाभले.