कोकण

संक्षिप्त

CD

- rat२४p४.jpg-
P२५N९३७९२
खेड ः रक्तदान शिबिराप्रसंगी उपस्थित भाजपचे पदाधिकारी आणि रक्तदाते.

भाजपच्या शिबिरात
१२५ जणांचे रक्तदान
खेड, ता. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि भाजप दक्षिण मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२५ जणांनी सहभाग घेतला.
रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी राजूभाई रेडीज, मंडल अध्यक्ष विनोद चाळके आदी उपस्थित होते. डेरवण येथील स्वामी समर्थ रक्तपेढीचे या शिबिराला सहकार्य लाभले. खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके यांनी या शिबिराचे अतिशय चांगले नियोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा चिटणीस किशोर आंब्रे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी सरपंच सचिन चाळके, उपाध्यक्ष संकेत हूमणे, पंड्या जाधव, बूथ अध्यक्ष संदेश खराडे, अमित चाळके, सोशल मीडिया प्रमुख रोशन कालेकर, कामगार मोर्चा अध्यक्ष संजय आंब्रे उपस्थित होते.
-----

खेड-भरणेसह
महामार्गावर कुत्र्यांचा धोका
खेड, ता. २४ : मुंबई-गोवा महामार्गासह खेड-भरणे रस्त्यावर वेरळ परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून त्याचा वाहनचालकांना त्रास होत आहे. श्वानांच्या वावराने पादचारीही मेटाकुटीस आले आहेत. रात्री मोकाट कुत्र्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही घडत आहेत.
नगरप्रशासनाने सात महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवली होती. सलग दोन महिने राबवण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ५०० मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते. मात्र अजूनही खेड-भरणे मार्गावर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी वाहनांच्या आडव्या येत आहेत. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. मोकाट कुत्र्यांच्या झुंडी त्रासदायक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंवर आगामी निवडणुकांसाठी भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी!

Bihar Election 2025 EXIT POLL : बिहारमध्ये मतदान संपताच ‘EXIT POLL’चे निकाल जाहीर; जाणून घ्या, ‘एक्झिट पोल’नुसार कुणाची येणार सत्ता?

Latest Marathi Breaking News : खोपोलीत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने बैलाला उडवलं, वाहतूक खोळंबली

Zilla Parishad Elections : तळेगाव ढमढेरे गावातून एकच उमेदवार देण्यासाठी बैठक संपन्न!

असाध्य ध्येयाला प्रेमाची साथ; जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा दाखवणाऱ्या 'ऊत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT