लांजा महाविद्यालयात
सायबर सुरक्षा जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २४ ः येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने ‘सायबर शिक्षा फार सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली. त्यामध्ये सोशल मिडीयाचा सुरक्षित वापर, फेक लिंक्स व ओटीपी स्कॅमपासून संरक्षण, पासवर्ड व्यवस्थापन आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता हे उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून, आपला अनुभव व्यक्त करत आणि चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवून सत्र अधिक संवादात्मक बनवले. याप्रसंगी सत्राला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुनील चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे सायबर सुरक्षिततेबाबत समाजात निश्चितच सकारात्मक बदल होईल असे मत व्यक्त केले. संपूर्ण सत्र सोप्या मराठीत घेण्यात आले असल्याने उपस्थितांनी ते सहज आत्मसात केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या उपक्रमात रिद्धी जाधव, अथर्व सावंत, आर्या रिसबुड, वरद सरदेसाई, यश पाकये, श्रेया चव्हाण यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तर महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांच्या परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वी पार पडला.