swt241.jpg
93850
सोनवडे तर्फ हवेलीः प्रेरणा दिवस अंतर्गत सोनवडे तर्फ हवेली शाळेला नायब तहसीलदार संतोष सावर्डेकर यांनी येथे भेट दिली.
सावर्डेकरांचा सोनवडेत मुलांशी संवाद
कुडाळ, ता. २५ः महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या प्रेरणा दिवस अंतर्गत नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गचे संतोष सावर्डेकर यांनी सोनवडे तर्फ हवेली शाळेला भेट दिली. संपूर्ण शालेय भौतिक सुविधा व गुणवत्ता यावर माहिती घेऊन मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण मेस्त्री, सरपंच नाजुका सावंत, उपसरपंच योगिता धुरी, शिक्षणतज्ज्ञ महिपाल धुरी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आकांक्षा धुरी, सदस्य शर्वरी सोनवडेकर, सलोनी सोनवडेकर यांच्याशी शाळेच्या गरजा व गुणवत्ता यावर चर्चा केली. गरजांवर योग्य तो पाठपुरावा करत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांशी सहज, सोप्या शब्दांत संवाद साधून आपला प्रेरणादायी प्रवास कथन केला. विद्यार्थ्यांनीही निर्भीडपणे चर्चेत प्रश्नांद्वारे सहभाग घेतला. या चर्चेत विद्यार्थी भावेश, कौशल, सिया, सिद्धी, कौस्तुभ, आदित्य, दुर्वेश, लावण्या यांनी प्रश्न विचारले. सावर्डेकर यांच्या प्रेरणादायी, वैचारिक व्यक्तिमत्त्वातून मुलांना एक नवी आदर्शवादी प्रेरणा मिळाली व नवीन दिशा मिळाली, असे मत यावेळी व्यक्त केले.
......
swt242.jpg
93851
पूजा म्हाडदळकर
सौंदर्य स्पर्धेत पूजा म्हाडदळकर उपविजेती
कुडाळ, ता. २४ः नेरुर गावची सुकन्या पूजा म्हाडदळकर ही ''मी महाराष्ट्राची सौंदर्यवती २०२५'' ची उपविजेती ठरली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे ही स्पर्धा झाली. या कार्यक्रमात १ दिवसाची ट्रेनिंग, मेकअप, हेअरस्टाईल, फोटोशॉट, ट्रॉफी, क्राउन, प्रमाणपत्र, पदक, सॅश, गिफ्ट व्हाउचर, सबटायटल अशा अनेक विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेत पूजा हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिने एकेरी नृत्य स्पर्धेत बऱ्याच ठिकाणी यश संपादन केले आहे. मॉडेलिंगमध्ये स्वरागिनी महिला रॅम्प ऑक तृतीय क्रमांक, मालवण सुंदरी बेस्ट कॅट ऑक, मिस आंदुर्ले २०२५, बेस्ट रॅम्प ऑक, दीपोत्सव २०२४ ओरोस बाजार तृतीय क्रमांक, ऑनलाईन फॅशन शो ४ रनरअप कुडाळ २०२४, मिस इंद्रधनू २०२३ बेस्ट हेअर स्टाईल, इनरव्हील क्वीन मिस सावंतवाडी बेस्ट कॅट ऑक २०२४-२५, इनरव्हील क्वीन मिस सावंतवाडी २०२५ बेस्ट कॅट ऑक, मळेवाड कोंडुरे मिस कोंडुरे बेस्ट कॅट ऑक, पिंगुळी महोत्सव २०२४ बेस्ट कॅट ऑक, पिंगुळी महोत्सव २०२४ बेस्ट कॅट ऑक अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त केले. पुणे येथील ‘मी महाराष्ट्राची सौंदर्यवती’ स्पर्धेसाठी तिला कास्टिंग डायरेक्टर, रॉयल ग्रुप डायरेक्टर नितीन जगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.