-rat23p36.jpg-
25N93655
रत्नागिरी ः शहराजवळील मिरकरवाडा येथे सागरीसुरक्षेबाबत माहिती घेताना व मच्छीमारांशी संवाद साधताना जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अधिकारी व अंमलदार.
---
पोलिस अधीक्षकांचा मच्छीमारांशी संवाद
सागरीसुरक्षेचा घेतला आढावा; सहकाऱ्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मिरकरवाडा येथील जेटीला भेट देऊन स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधला. किनारपट्टीवरील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी मच्छीमारांना मदतीचे आवाहन केले.
जिल्ह्याची किनारपट्टीची भौगोलिक रचना लक्षात घेता इथली सुरक्षाव्यवस्था कायमच संवेदनशील मानली जाते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बगाटे यांनी जातीने लक्ष घालून मिरकरवाडा जेटीवरील सर्व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ सुरक्षाव्यवस्थेचा आढावाच घेतला नाही. समुद्रातील बोटींची पाहणी करून त्यांची तपासणीही केली. मच्छीमारांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच मासेमारीसाठी बोंटीवर काम करणाऱ्या नेपाळी खलाश्यांची माहिती घेऊन त्यांची नोंदणी व्यवस्थित आहे का, याचीही खात्री केली. किनारपट्टीवरील अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलिसदल आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रात किंवा किनारपट्टीवर कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाला कळवण्याचे आवाहन त्यांनी मच्छीमारांना केले. पोलिस अधीक्षक बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाच्या नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त केली. नौकेत बसून त्यांनी समुद्रातील परिस्थिती आणि गस्तीची पद्धत जवळून अनुभवली. यामुळे किनारपट्टीच्या सुरक्षेची स्थिती अधिक स्पष्ट झाली.
---
दक्ष राहण्याच्या सूचना
सागरी किनारपट्टीची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.