swt245.jpg
93854
मळेवाडः मान्यवर व्यक्तींचा सत्कार करताना सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे व इतर मान्यवर. (छायाचित्र ः धनश्री मराठे)
मळेवाड ग्रामपंचायतीमार्फत
कर्तबगार व्यक्तींचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. २५ः ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचायतराज अभियानाबाबत आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ग्रामसभेत ग्रामपंचायतीकडून उद्योजक अविनाश कुंभार, सावंतवाडी तालुक्यात प्रगत शेतकरी म्हणून पहिला क्रमांक मिळविलेले बाळू मुळीक यांच्यासह पाणी कर्मचारी सिद्धेश मुरकर, प्रतीक नाईक, श्रीकृष्ण इन्सुलकर, नंदू पालयेकर, राजू मोरुडकर, सर्पमित्र उल्हास कोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, अमोल नाईक, अर्जुन मुळीक, स्नेहल मुळीक, कविता शेगडे, महेश शिरसाट, मधुकर जाधव, गिरिजा मुळीक, दिगंबर मसूरकर, बंटी मुळीक, अमित नाईक, ज्योती शिरसाट, दर्शना शिरसाट उपस्थित होते.
...................
swt246.jpg
N93855
सिंधुदुर्गनगरी : क्रीडा शिक्षिका चित्राक्षा मुळये, रश्मी रासम. सोबत लेफ्टनंट विवेक राणे.
किक बॉक्सिंगमध्ये सिंधुदुर्गचे यश
ओरोस, ता. २५ः मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया आयोजित सातारा येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीच्या क्रीडा शिक्षिका चित्राक्षा मुळये यांनी रौप्यपदक प्राप्त केले. डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोसमधील विद्यार्थिनी रश्मी रासम हिने कांस्यपदक प्राप्त केले. या दोन्ही खेळाडू जिजामाता स्पोर्ट्स क्लब ओरोसमध्ये धडे घेत आहेत. या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीची वेदा खोत, मान्यता मालविया व डॉन बॉस्को स्कूल ओरोसची धनश्री बांबर्डेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. यशस्वी खेळाडूंना सिंधुदुर्ग जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे शिवाजी नाट्यमंदिर दादरचे अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.