मालवण ग्रामोद्योग
संस्थेची रविवारी सभा
मालवण : मालवण तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ लिमिटेड संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता नगरवाचन मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन सुभाष तळवडेकर, सचिव आर. एस. परब यांनी केले आहे.
वायंगणी ग्रामस्थांकडून
सदा राणेंना श्रद्धांजली
आचरा : सामाजिक कार्यकर्ते, ज्ञानदीप संस्था वायंगणीचे माजी अध्यक्ष सदा राणे यांचे सामाजिक कार्य आदर्शवत होते, असे उद्गार ॲड. समृद्धी आसोलकर यांनी काढले. वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय आणि ग्रामस्थांतर्फे वायंगणी हायस्कूल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत हनुमंत प्रभू, दीपक सुर्वे, बाबू हडकर, वैभव जोशी, मनोहर वायंगणकर, सुरेश सावंत, संतोष वायंगणकर, दीपक सावंत, विलास सावंत, उदय दुखंडे, अशोक सावंत, सुशांत आसोलकर, शंकर ऊर्फ बाळू वस्त, सुंदर सावंत, मुख्याध्यापक टकले, शिक्षक यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
बांद्यात नवरात्रीनिमित्त
रविवारी रंगभरण स्पर्धा
बांदा : येथील सांस्कृतिक कला, क्रीडा व समाज विकास मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी (ता. २८) सायंकाळी ४ वाजता होणार असून, विविध गटांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत केजी ते तिसरी, चौथी ते सातवी, आठवी ते बारावी आणि खुला गट अशा चार विभागांमध्ये विद्यार्थ्यांना व नागरिकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. केजी ते तिसरी गट प्रथम तीन क्रमांकांना ५००, ३००, २०० व चषक, चौथी ते सातवीसाठी १०००, ५००, ३०० व चषक, आठवी ते बारावी गटासाठी १५००, १०००, ५०० व चषक, खुला गटासाठी ३०००, १५००, १००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा ओम गणेश कन्स्ट्रक्शनचे रोहन गवस व सिद्धेश नाईक यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धकांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी केदार कणबर्गी किंवा मंगलदास साळगावकर यांच्याशी संपर्क साधावा. बांदा परिसरातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.