कोकण

जिल्हा सायकलिंग स्पर्धेत तृप्ती दळवीला विजेतेपद

CD

swt251.jpg
94122
कुडाळ ः जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत तृप्ती दळवी विजेती ठरली.

सायकलिंग स्पर्धेत तृप्ती दळवी विजयी
कुडाळः क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने येथील बॅ. नाथ पै एमआयडीसी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत दादासाहेब तिरोडकर व शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा प्रशालेची विद्यार्थिनी तृप्ती दळवी हिने मास स्टार्ट १० ते १२ किलोमीटर या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. प्रशालेच्या संस्था चेअरमन आप्पासाहेब गावडे, सेक्रेटरी नागेंद्र परब, मुख्याध्यापक संजय गावकर, पर्यवेक्षक कर्पे आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडाशिक्षक यांनी अभिनंदन केले.
.................
swt252.jpg
93411
मुंबईः रचना नेरुरकर यांचे अभिनंदन करताना ज्योती वाघमारे.

''शिवउद्योग'' महिला आघाडी
उपजिल्हा प्रमुखपदी नेरुरकर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः तालुक्यातील नेरुर येथील रचना नेरुरकर यांची शिवउद्योग संघटनेच्या महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. शिवसेना पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हा प्रमुख दीप्ती पडते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे. शिवउद्योग संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहले, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे ही निवड प्रक्रिया झाली. नेरुरकर यांची नियुक्ती झाल्याने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त महिलांना बचतगटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे, कन्नड वंशाचे होते'; कन्नड साहित्यिकाच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Prataprao Pawar: कृषी क्षेत्रात ‘एआय’चा नवा अध्याय; प्रतापराव पवार, ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘एआय-एमएल-आयओटी’ सामंजस्य करार

Sakal Premier League: आजपासून रंगणार ‘सकाळ प्रीमिअर लीग’चा थरार; विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार, विजेतेपदासाठी झुंजणार ३२ संघ

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी

India Women Kabaddi: भारत अंतिम फेरीत दाखल; महिला विश्वकरंडक कबड्डी, इराणवर मात

SCROLL FOR NEXT