94133
मिलाग्रीस मराठी शाळेत
विविध समित्यांची बैठक
सावंतवाडी, ता. २६ ः येथील मिलाग्रीस मराठी माध्यमाच्या शाळेत शालेय स्तरावरील विविध समित्यांची बैठक झाली. यावेळी प्रशालेचे व्यवस्थापक फादर मिलेट डिसोझा, मुख्याध्यापिका कविता चांदी, सिंधुदुर्ग जिल्हा माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, स्थानिक प्राधिकरण सदस्य व माजी नगरसेविका भारती मोरे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीम. मुळीक, समुपदेशक अर्पिता वाटवे, महिला पोलिस अंमलदार शर्मिला गवस, डॉ. मिनल भांबुरे, समित्यांतील सर्व सदस्य व शिक्षक उपस्थित होते.
शालेय स्तरावरील विविध समित्यांची माहिती बारदेस्कर, पास्ते, प्राजक्ता कांबळे, गवस यांनी दिली. विद्यार्थी सुरक्षा व महिला सुरक्षा तसेच आपण आपल्या जीवनात सावधानता बाळगणे का गरजेचे आहे? याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीम. मुळीक यांनी केले. समुपदेशक म्हणून अर्पिता वाटवे यांनी पालकांनी पाल्याबद्दल जागरूक राहणे का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली.