94134
मळेवाडमध्ये स्वच्छता मशाल फेरी
मळेवाड, ता. २६ ः ग्रामपंचायत मुळेवाड कोंडुरेतर्फे पंचायतराज अभियान अंतर्गत स्वच्छता मशाल फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सर्व गावागावांमध्ये राबवले जात आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये हे अभियान मोठ्या जोमाने आणि उत्साहाने राबवले जात आहे. यालाच अनुसरून ग्रामस्थ, बचतगट महिला, विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘घरापासून सुरुवात करा, स्वच्छ भारत घडवा’ अशा घोषणा देऊन मुळेवाड शाळा क्र. १ ते मळेवाडी जकात नगर चौक अशी फेरी काढून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक, मुख्याध्यापक वेंगुर्लेकर, शिक्षक बांबुळकर आदी उपस्थित होते.