कोकण

मुंबई विद्यापीठ जलतरण स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाला उपविजेतेपद

CD

-rat२५p३५.jpg-
P२५N९४१९३
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ जलतरण स्पर्धेत यश मिळवणारे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा संघ. सोबत पुढे बसलेले डॉ. मकरंद साखळकर,
डॉ. विनोद शिंदे, महेश मिलके आदी.
----

जलतरणमध्ये गोगटे महाविद्यालयास उपविजेतेपद
मुंबई विद्यापीठ ; २ सुवर्ण, ४ रौप्य, ३ ब्रॉन्झ पदकांना गवसणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : मुंबई विद्यापीठ जलतरण पुरुष आणि महिला स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघाने २ सुवर्ण, ४ रौप्य, ३ कास्यपदक पटकावली. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला जलतरण स्पर्धेतील उपविजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई विद्यापीठ आणि ठाकुर्ली येथील काशीबाई मोतीलाल पटेल मातोश्री महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा डोंबिवली पूर्व येथील ऑलिंपिक स्पोर्ट्स सेंटरमध्ये झाल्या.
जलतरण स्पर्धा पुरुष गटामध्ये करण मिलके याने १०० मीटर बटरफ्लायमध्ये कास्यपदक प्राप्त केले. महिला सहभागी संघात तनया मिलके हिने १०० मी. बॅकस्ट्रोक रौप्यपदक, २०० मी. मेडली रौप्यपदक, ५० मी. फ्री स्टाइल रौप्यपदक, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक कास्यपदक आणि १०० मी. फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक, ५० मी. बॅकस्ट्रोक सुवर्णपदक, २०० मी. बॅकस्ट्रोक कास्यपदक, ४०० मी. फ्री स्टाइल कास्यपदक, २०० मी. बटरफ्लायमध्ये रौप्यपदक प्राप्त केले. महिला जलतरण - ४×१०० मी. रीले संघ फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक मिळवले.
संघात तनया मिलके, संस्कृती जाधव, श्रावणी सावंत, नफिजा मंगा या पदकप्राप्त विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) महिलासंघाने महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला जलतरण २०२५-२६ स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थी खेळाडू यांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, महेश मिल्के स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष महेश मिलके यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात

SCROLL FOR NEXT