सावंतवाडी येथे बुधवारी
ज्येष्ठ नागरिक मेळावा
सावंतवाडीः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा वार्षिक मेळावा बुधवारी (ता. १) आयोजित केला आहे. येथील आर. पी. डी. हायस्कूलच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दीपक केसरकर, डॉ. रुपेश पाटकर, माजी पोलिस उपाधीक्षक दयानंद गवस, विशाल परब उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ७५ वर्षे (जन्म १९५०), ८० वर्षे (जन्म १९४५) आणि ९० वर्षे पूर्ण (जन्म १९३५) झालेल्या सदस्यांचा विशेष सन्मान केला जाईल. ज्या दांपत्यांच्या वैवाहिक जीवनाला ५० वर्षे पूर्ण (विवाह १९७५) झाली आहेत, अशा दांपत्यांचाही सत्कार करण्यात येईल. सर्व सदस्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन यावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष दिगंबर पावसकर यांनी केले आहे.
........................
सावंतवाडीत रंगणार
उद्या ‘स्नेहसंमेलन’
सावंतवाडीः येथील स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने शनिवारी (ता. २७) सायंकाळी ४ वाजता ‘स्नेहसंमेलन’ आयोजित केले आहे. हे संमेलन नॅब सभागृह, नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री नीतेश राणे, माजी शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे बाळ परब, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांडुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, उपाध्यक्ष पल्लवी केसरकर तसेच संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.
........................
मातोंड येथे
विविध कार्यक्रम
वेंगुर्लेः देवस्थान कमिटी मातोंड, श्री देवी सातेरी युवक कला क्रीडा मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उत्सवात रोज सायंकाळी भजने व रात्री आठ वाजता निमंत्रित दांडिया होणार आहे. त्या व्यतिरिक्त आज रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित फुगडी स्पर्धा, २६ ला रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सामना (श्री देव केसरकर हनुमान महिला भजन मंडळ, वर्दे-कुडाळ बुवा - योगिता पवार, विरुद्ध भैराई देवी भजन मंडळ, मोंड देवगड बुवा प्रणाली अनभवणे), २७ ला रात्री ९ वाजता नृत्याविष्कार, २८ ला रात्री ९ वाजता ओमकार डान्स अॅकॅडमी सावंतवाडी, २९ ला रात्री ९ वाजता ओमी डान्स अॅकडमी प्रस्तुत नटरंग, ३० ला दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता होम मिनिस्टर, १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रवळनाथ मंदिर येथे दसरोत्सव, असे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी या सोहळ्याचा लाभघ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी मातोंड व श्री देवी सातेरी युवक कला, क्रीडा मंडळाने केले आहे.
------------------
ओटवणेत २९ ला
डबलबारी सामना
ओटवणेः येथील वाचनालय सार्वजनिक पुरस्कृत आणि नवरात्र उत्सव मंडळातर्फे सोमवारी (ता.२९) रात्री ८ वाजता २०/२० डबलबारीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना ओंकार प्रासादिक भजन मंडळ (सरमळे) बुवा संजय गावडे, पखवाज सुदेश सावंत, प्रदीप वाळके, तबला सूरज सरमळकर, कुणाल आळवे आणि श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (विलवडे) बुवा महेश नाईक, पखवाज रामा गवस, तबला राकेश गवस यांच्यात होणार आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.