गोसावी मंडळातर्फे
कोचऱ्यात ‘भंडारा’
वेंगुर्ले ः कोचरे येथील सिद्ध महापुरुष मठामध्ये घटस्थापनेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त १ ऑक्टोबरला भंडारा उत्सव साजरा होणार आहे. यावेळी भाविक भक्तांनी दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तेथील गोसावी मंडळाच्या वतीने गणपत गोसावी यांनी केले आहे.
कणकवलीत सोमवारी
पेन्शनसंदर्भात बैठक
कुडाळ ः राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सोमवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता कणकवली येथील एसटी विभाग नियंत्रक कार्यालय जवळील श्री गणेश मंदिर येथे सिंधुदुर्ग विभागातील इपीएस-९५ पेन्शन धारक निवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस भविष्य निर्वाह निधी कार्यालय कोल्हापूर येथील उपआयुक्त व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीमध्ये ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ईपीएस-९५ संबंधी ज्यांची पेन्शन बंद झाली, चालू झाली नाही, विधवा पत्नींना पेन्शन मिळत नाही अशा तक्रारी असतील, त्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे. महावितरण, पतसंस्था, सिंधुदुर्ग बँक, एसटी असे महामंडळ आदी विभागांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला निवृत्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेंद्र राणे व सरचिटणीस मनोहर आरोलकर यांनी केले आहे.