कोकण

भुईबावडा येथे कृषिदूतांकड़ून शेतकऱ्यांना ''श्री'' पध्दतीचे धडे

CD

94271


भुईबावडा येथे कृषिदूतांकड़ून
शेतकऱ्यांना ''श्री'' पध्दतीचे धडे
सकाळ वृतसेवा
वैभववाडी, ता. २५ : येथील सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी भुईबावडा येथे कृषी माहिती केंद्र सुरू केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती परीक्षण, हळद लागवड, श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रशिक्षण दिले. सांगुळवाडी कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गंत भुईबावडा येथे विविध उपक्रम राबविले. या विद्यार्थ्यांनी या भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळावी, या हेतूने कृषी माहिती केंद्र सुरू केले. प्रा. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश मोरे यांच्या हळद बागेत माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पहिली वाडी भुईबावडा येथील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषिदूत अविष्कार जगताप, सुमित हजारे, सुजल जमदाडे, आकाश ओऊळकर, दत्ता सुरवसे, औदुंबर शेंडगे, सिद्धार्थ अब्दागिरे, गौरव चिकने, सारंग केसरकर व दीपक जामदार या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व आणि त्याचा शेतीतील फायदा याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCBला व्हावं लागणार पुणेकर? बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीमुळे IPL 2026मध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता....

Yamaha New Bike : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Yamaha XSR155 सुपर बाइक; दमदार फीचर्स..अन् किंमत परवडेल अशी

Latest Marathi Breaking News : बोरीवलीत महिलेसोबत छेडछाड; आरोपी अटकेत

Kolhapur leopard: कोल्हापूरात बिबट्याचा थरार! दोन तासांच्या मोहिमेनंतर अखेर जेरबंद

Gadchiroli Crime: 'हरवलेले, चोरीला गेलेले ९० मोबाईल फोन शोधून काढले'; गडचिरोली पोलिसांची काैतुकास्पद दलाची कामगिरी..

SCROLL FOR NEXT